Ira Khan Nupur Shikhare Engaged : बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट सुपरस्टार आमिर खान याची मुलगी आयरा खान बंधनात अडकली आहे. तिनं तिच्या आयुष्यातील सर्वात मोठी आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली. आयरानं तिचा बॉयफ्रेंड नुपूर शिकरेसोबत साखरपुडा केला आहे. तिवं एक व्हिडिओ शेअर केला ज्यामध्ये नुपूर तिला खूप रोमँटिक पद्धतीने प्रपोज करताना दिसत आहे. आयरा खान सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. ती अनेकदा तिचे फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. अलीकडेच, तिनं एक व्हिडिओ शेअर केला जो तिच्या आयुष्यातील सर्वात खास व्हिडिओ असेल.
नुपूर गुडघ्यावर बसतो आणि आयरासमोर अंगठीचा बॉक्स उघडतो. आयरा हसते आणि नुपूरला अंगठी घालायला लावते. त्यानंतर दोघेही किस करतात. आयरा आणि नुपूरचा हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे आणि चाहत्यांसह सेलेब्सनाही तो आवडला आहे. सारा तेंडुलकर, आरजे आलोक, हुमा कुरेशी, सिद्धार्थ मेनन आणि हेजल कीच यांनीही व्हिडिओवर कमेंट केली आहे. आयरा आणि नुपूर शिखर बऱ्याच दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. अलीकडेच आयराच्या वाढदिवसाला आमिरच्या संपूर्ण कुटुंबासह नुपूरही उपस्थित होता.
हेही वाचा – गूड न्यूज..! ‘ही’ कंपनी देणार भारतात ९,००० नोकऱ्या; वर्क फ्रॉम होमचीही सुविधा!
आयरा आणि नुपूर २०२० पासून रिलेशनशिपमध्ये आहेत. दोघांची जोडी चाहत्यांच्या पसंतीस उतरली आहे. ही जोडी सोशल मीडियावर एकत्र फोटो शेअर करत असते. त्यांची केमिस्ट्री मजबूत आहे. आयराच्या कुटुंबालाही नुपूर खूप आवडते. आयरा आणि नुपूर एकत्र सहलीला जातात. दोघांनाही प्रवासाची आवड आहे. नुपूर हा फिटनेस ट्रेनर आहे. आयरा ही आमिर खान आणि रीना दत्ता यांची मुलगी आहे. काही वर्षांपूर्वी आयराने थिएटर डायरेक्टर म्हणून पदार्पण केले होते.