भीषण अपघात..! IIT विद्यार्थ्यांची बस ५०० फूट दरीत कोसळली; ७ जणांचा मृत्यू!

WhatsApp Group

Tempo Traveller Accident : हिमाचल प्रदेश जिल्ह्यातील कुल्लू येथील जालोरी जोत या पर्यटन स्थळाला भेट देण्यासाठी गेलेल्या १७ जणांचा ग्रुप अपघाताचा बळी ठरला. बंजार येथील घायगी येथे पर्यटकांचा टेम्पो ट्रॅव्हलर सुमारे ५०० फूट दरीत कोसळला. या अपघातात ७ पर्यटकांचा मृत्यू झाला, तर १० जण जखमी झाले. रात्री उशिरा ९ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. राष्ट्रीय महामार्ग ३०५ वर घागी येथे यापूर्वीही अपघात झाले आहेत. अरुंद रस्ता आणि पावसामुळे निसरडा हे येथील अपघातांचे प्रमुख कारण आहे. आयआयटी वाराणसीच्या विद्यार्थ्यांसह एकूण १७ पर्यटक दिल्लीतील मजनून टिल्ला येथून कुल्लूला आले होते. यामध्ये चार राज्यांतील पर्यटकांचा समावेश होता.

रविवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास हे पर्यटक जालोरी होल्डिंगवरून वळसा घालून परत बंजार येथे येत असताना घागी वळणावर गाडी उतरविताना ब्रेक न लागल्याने गाडी थेट ५०० फूट खाली कोसळली. या अपघातात गाडीचा चक्काचूर झाला. जखमींचा आरडाओरडा ऐकून आजूबाजूच्या लोकांनी घटनास्थळ गाठून त्यांना दरीतून बाहेर काढले आणि रुग्णालयात नेले.

हेही वाचा – ऑस्ट्रेलियानंतर आता भारतासमोर दक्षिण आफ्रिका; वाचा टी-२० आणि वनडे मालिकेचं वेळापत्रक!

 

अपघाताची माहिती मिळताच प्रशासन आणि पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचला. तीन पर्यटकांचा वाटेतच मृत्यू झाला. प्राथमिक उपचारानंतर जखमींना बंजार रुग्णालयात प्रकृती पाहता कुल्लू आणि नेरचौक रुग्णालयात पाठवण्यात आले. जखमींना उपचारासाठी मुख्यमंत्र्यांनी मनाली-चंदीगड महामार्ग खुला ठेवण्याचे निर्देश दिले.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment