Student Dies In Classroom : दिल्लीत एक धक्कादायक घटना घडली आहे. एका शाळकरी विद्यार्थ्याचा वर्गातच मृत्यू झाला. आंध्र प्रदेशपाठोपाठ आता दिल्लीत अशी घटना घडल्यामुळं सर्वत्र खळबळ उडाली आहे. या विद्यार्थ्याची प्राणज्योत कशी मालवली, याचं कारण समजू शकलेलं नाही. विद्यार्थ्याचं पोस्टमार्स्टम करण्यात येत आहे. पोलीस आपली पुढची कारवाई करत आहेत.
रोहिणी भागातील एका सरकारी शाळेत हा प्रकार घडला. वर्गात बसलेल्या दुसरीच्या मुलाचा मृत्यू झाला. मुलाचे कुटुंबीय या घटनेनं हादरले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा विद्यार्थी वर्गातच बेशुद्ध झाला होता. त्यानंतर मुलाला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आलं, तिथं डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. प्रकरणी पोस्टमॉर्टम केलं जाईल, जेणेकरून विद्यार्थ्याचा मृत्यू कसा झाला हे उघड होईल.
हेही वाचा – IND Vs AUS : बुमराहचं यॉर्कररस्त्र..! ‘त्या’ भयानक चेंडूचं ऑस्ट्रेलियाच्या कॅप्टनकडून कौतुक; पाहा VIDEO
आंध्र प्रदेशमध्येही अशीच घटना
७ सप्टेंबर रोजी आंध्र प्रदेशातील नेल्लोर शहरातील जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये सातवीच्या विद्यार्थीनीचा रहस्यमय मृत्यू झाला होता. यात शिक्षकानं तिला प्रश्न विचारला होता. विद्यार्थिनी उत्तर देत असतानाच तिचा मृत्यू झाला. शिक्षकानं प्रश्न विचारला त्यावर या विद्यार्थीनीनं उभं राहून उत्तर देण्यास सुरुवात केली, पण शिक्षकानं दुसऱ्या मुलीला प्रश्न विचारला. त्यावर विद्यार्थीनी नाराज झाली आणि तिनं शेजारी बसलेल्या विद्यार्थिनीचा हात पकडला. इतक्यात ती बेशुद्ध झाली. तिला रुग्णालयात नेलं असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं होतं.