Video : तलावात पडलं प्रवासी विमान..! टांझानियातील दुदैवी घटना; पाहा Video

WhatsApp Group

A Plane Crashed Into Lake In Tanzania : आफ्रिकन देश टांझानियामधील तलावात एक प्रवासी विमान कोसळले आहे. प्रवाशांमध्ये जीवितहानी होण्याची शक्यता आहे. सीएनएनच्या वृत्तानुसार, घटनेनंतर मदत आणि बचाव कार्य वेगाने सुरू आहे. तलावात कोसळलेले विमान प्रिसिजन एअर कंपनीचे होते. कंपनीच्या निवेदनानुसार, हे एक व्यावसायिक विमान होते, जे व्हिक्टोरिया सरोवरात कोसळले. प्रिसिजन एअरच्या प्रवक्त्याने सांगितले की, विमान बुकोबा विमानतळाजवळील आफ्रिकेतील सर्वात मोठ्या सरोवरात कोसळले.

मात्र, विमानात किती लोक होते आणि अपघातात किती लोक जखमी झाले हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त विमानात ४९ जण होते. प्रिसिजन एअर ही टांझानियन एअरलाइन कंपनी आहे. तलावात कोसळलेल्या विमानातून लोकांना वाचवण्याचे काम सुरू असताना टांझानियाच्या राष्ट्रपतींनी सोशल मीडियावर लिहिलेल्या संदेशात लोकांना शांतता आणि संयम राखण्याचे आवाहन केले आहे.

हेही वाचा – IND Vs ZIM : मेलबर्नमध्ये सूर्यकुमार यादवचं वादळ..! बॉलर्सच्या उडवल्या चिंधड्या; पाहा

सिटीझन टीव्ही केनियाने विमान तलावात कोसळल्याचा व्हिडिओ ट्वीट केला आहे.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment