आता घरात मिळेल फुकट वीज! निर्माण होईल सूर्यासारखी ऊर्जा; हैदराबादमध्ये लागलाय क्रांतिकारी शोध!

WhatsApp Group

Hyderabad Nuclear Reactor Start-Up : जरा कल्पना करा, तुमच्या घरातील विजेच्या सर्व गरजा सूर्यासारख्या उर्जेने भागवल्या तर काय होईल? आता ही केवळ कल्पना नसेल, कारण हैदराबादमधील एका भारतीय स्टार्टअपने जगातील पहिला शोध लावला आहे, जो प्रत्येक घरात न्युक्लिअर रिअॅक्टर बसवण्याचे स्वप्न पूर्ण करू शकतो. विशेष गोष्ट अशी आहे की तुम्ही हा लो-एनर्जी न्यूक्लियर रिॲक्टर (LENR) तुमच्या घराच्या टेबलावर ठेवू शकता आणि यामुळे कोणतेही प्रदूषण होत नाही किंवा कोणत्याही प्रकारचे रेडिओएक्टिव्ह रेडिएशन बाहेर पडत नाही. हा जादुई शोध हैदराबादस्थित घरगुती स्टार्टअप हायलेनर (Hylenr) ने लावला आहे.

कंपनीचा दावा आहे, की हे जगातील पहिले कोल्ड फ्यूजन तंत्रज्ञान आहे, जे स्वच्छ ऊर्जा तयार करते. हे उत्पादन पद्मश्री पुरस्कारप्राप्त डॉ. प्रल्हाद रामाराव यांच्या हस्ते हैदराबादमध्ये लाँच करण्यात आले. डॉ रामराव हे प्रसिद्ध क्षेपणास्त्र शास्त्रज्ञ आणि आकाश क्षेपणास्त्र प्रणालीचे प्रकल्प संचालक आहेत. यावेळी हायलेनरचे मुख्य वैज्ञानिक अधिकारी डॉ.वरप्रसाद, मुख्य रणनीती अधिकारी राम रामसेसन आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धार्थ दुराईराजन उपस्थित होते. या शोधाला भारत सरकारकडून पेटंटही मिळाले आहे.

उत्पादनाची खासियत

कंपनीचे म्हणणे आहे, की हे उत्पादन न्युक्लियर फ्युजन तंत्रज्ञानावर आधारित आहे, जे सूर्यप्रकाशात आढळते. त्याच्या मदतीने उष्णता वाढवता येते. या तंत्रात हायड्रोजनचे रेणू एकत्र येऊन उष्णता निर्माण करतात. डॉ. रामाराव म्हणाले, आम्हाला माहित आहे की बहुतेक लोक न्यूक्लियर फ्यूजनच्या नावाने घाबरतात. आम्ही या उत्पादनामध्ये फार काही केले नाही, फक्त हायड्रोजन, निकेल आणि पॅलेडियम जोडून अतिरिक्त ऊर्जा निर्माण केली आहे. त्याची अणुभट्टी देखील स्टीलची आहे आणि त्यातून बाहेर पडणारी ऊर्जा रेडिओॲक्टिव्ह नाही किंवा कोणतेही प्रदूषण देखील करत नाही.

हेही वाचा –ITR Filing : 31 जुलैनंतरही भरता येतो इनकम टॅक्स रिटर्न, कोणाला मिळते ही सुविधा? जाणून घ्या

उत्पादन कसे कार्य करते?

या उत्पादनामध्ये कमी ऊर्जा वापरून अधिक ऊर्जा आणि उष्णता निर्माण करण्याची क्षमता आहे. त्याची प्रतिक्रिया अगदी कमी प्रमाणात वीज वापरून सुरू केली जाऊ शकते आणि यामुळे ऊर्जा दीड ते अडीच पट वाढेल. हे उत्पादन वीजनिर्मितीच्या क्षेत्रात गेम चेंजर ठरू शकते. कंपनीचे म्हणणे आहे की ते बनवण्यासाठी सुमारे 10 वर्षे लागली आणि या उत्पादनाची किंमत प्रति रिॲक्टर 1 लाख रुपये आहे.

हिवाळ्यात रूम हीटर म्हणून वापरता येईल, असे कंपनीचे म्हणणे आहे. तसेच, इंडक्शनसारखे तंत्रज्ञान आणखी वाढवता येते. हे वाफेच्या निर्मितीपासून विविध घरगुती आणि औद्योगिक गरजांसाठी वापरले जाऊ शकते. लाँचच्या प्रसंगी, कंपनीने थेट चाचणीमध्ये दाखवले की या उत्पादनाने फक्त 100 वॅट वीज वापरून 150 वॅट उष्णता निर्माण केली. त्याचा व्यावसायिक वापर वाढवण्यासाठी आम्ही निधीची वाट पाहत आहोत, असे कंपनीने म्हटले आहे.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment