VIDEO : 5 वर्षाच्या मुलाचा रेकॉर्ड! अवघ्या 1 मिनिट 35 सेकंदात वाचली हनुमान चालिसा

WhatsApp Group

Hanuman Chalisa Record : पंजाबमधील भटिंडा येथे राहणाऱ्या एका पाच वर्षाच्या मुलाने एक मिनिट 35 सेकंदात हनुमान चालिसाचे पठण करून इतिहास रचला आहे. यासोबतच गीतांश गोयल या तरुणाने इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये आपलाच जुना विक्रम मोडीत काढला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू देखील गीतांशच्या या कामगिरीवर खूप आनंदी आहेत. त्यामुळेच 30 ऑगस्ट रोजी राष्ट्रपती भवनात गीतांशचा सन्मान करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

2018 मध्ये, हजारीबाग, झारखंड येथे राहणाऱ्या युवराज या पाच वर्षाच्या मुलाने एक मिनिट 55 सेकंदात हनुमान चालिसाचे पठण केले होते. त्यानंतर त्याचे नाव इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंदवले गेले. चार वर्षांनंतर म्हणजेच 2022 मध्ये युवराजचा रेकॉर्ड गीतांशने मोडला. अवघ्या एका सेकंदाने त्याने हे विजेतेपद पटकावले. त्यानंतर गीतांशने एक मिनिट 54 सेकंदात हनुमान चालिसाचे पठण केले.

हेही वाचा – Rakshabandhan 2023 : 23 वर्षाच्या बहिणीने किडनी देऊन वाचवले भावाचे प्राण!

आता स्वतःचाच विक्रम मोडत गीतांशने एक मिनिट 35 सेकंदात हनुमान चालिसा पठण करून नवा विक्रम केला आहे. मुलाच्या या कामगिरीने गीतांशचे कुटुंब खूप उत्साहित आहे. साधारणपणे एवढ्या लहान वयात हनुमान चालीसाचे स्मरण करणे खूप कठीण मानले जाते, परंतु या मुलाने हनुमान चालीसाचे अतिशय वेगाने पठण करण्याचा विक्रमही केला आहे.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment