7th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांची लॉटरी..! DA ‘इतका’ वाढणार; ३१ जानेवारीला…

WhatsApp Group

 7th Pay Commission : केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. जर तुम्हीही वाढीव पगाराची वाट पाहत असाल तर तुम्हाला फक्त काही दिवस वाट पाहावी लागेल. सरकारी कर्मचाऱ्यांच्या डीए वाढीसाठी अवघे १५ दिवस उरले आहेत. डीएचा आकडा ३१ जानेवारीला जाहीर होणार आहे. या आकडेवारीवरून हे स्पष्ट होईल की या वर्षाच्या पहिल्या सहामाहीत तुमचा पगार किती वाढणार आहे. एआयसीपीआय इंडेक्सचा डेटा दर महिन्याच्या शेवटच्या तारखेला प्रसिद्ध केला जातो.

पगार वाढेल

यावेळी त्यांच्या पगारात बंपर वाढ होण्याची आशा कर्मचाऱ्यांना आहे. आकडेवारी जाहीर झाल्यानंतर सरकार होळीपूर्वी कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ करू शकते. AICPI निर्देशांकाच्या आधारे, महागाई भत्ता किती टक्के वाढेल हे ठरवले जाते.
नोव्हेंबर २०२२ पर्यंतच्या आकडेवारीनुसार, महागाई भत्ता ३ टक्क्यांनी वाढणार आहे. डिसेंबर महिन्यात या निर्देशांकात बदल न झाल्यास कर्मचाऱ्यांच्या पगारात ३ टक्के वाढ होणार आहे. दुसरीकडे, जर निर्देशांकात १ अंकाची वाढ झाली तर डीएमध्ये ४ टक्क्यांनी वाढ होऊ शकते.

हेही वाचा – IND Vs SL : विराट कोहलीचा हेलिकॉप्टर शॉट..! चेंडूला धाडलं सीमापार; पाहा Video

आता मिळतोय ३८ टक्के डीए

कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ३ टक्के वाढ झाल्यास कर्मचाऱ्यांना ४१ टक्के दराने डीए मिळेल. जुलै २०२२ मध्ये सरकारने कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये ३८ टक्के वाढ केली होती.

दरवाढ कधी जाहीर होणार?

कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता वाढीची घोषणा मार्च महिन्यात होऊ शकते. १ मार्च रोजी होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत याला मंजुरी मिळू शकते, म्हणजेच कर्मचाऱ्यांना ३१ मार्चपासून वाढीव पगार मिळू शकतो, असे माध्यम सूत्रांनी सांगितले. यासोबतच जानेवारी व फेब्रुवारी महिन्याचे पैसे थकबाकीसह खात्यात येणार आहेत.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment