7th Pay Commission : केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. तुम्हीही डीए (DA Hike) वाढीची वाट पाहत असाल तर २ दिवसांनंतर तुमच्या पगारात बंपर वाढ होणार आहे. मार्च महिन्यात सरकार लाखो कर्मचारी आणि पेन्शनधारकांना होळीची भेट देणार आहे. यावेळी मार्च महिन्यात केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात १,२०,००० रुपयांनी वाढ होणार आहे. अधिकृत माहितीनुसार, यावेळीही सरकार महागाई भत्त्यात ४ टक्क्यांनी वाढ करणार आहे.
डीएमध्ये ४ टक्के वाढडीएमध्ये ४ टक्के वाढ झाल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या पगारात बंपर जंप होणार आहे. यासोबतच कर्मचाऱ्यांना ४२ टक्के दराने डीएचा लाभ मिळणार आहे. हा लाभ जानेवारी २०२३ पासूनच मिळणार आहे.
पगार १,२०,००० ने वाढेल
महागाई भत्त्यात वाढ झाल्यामुळे कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार आहे. जर कोणत्याही कर्मचाऱ्याचा मूळ पगार दरमहा ३०,००० रुपये असेल तर त्याच्या पगारात दरमहा १२०० रुपयांची वाढ होईल. त्यानुसार वार्षिक एकूण पगारात १४४०० रुपयांची वाढ होणार आहे. दुसरीकडे, जर एखाद्या कर्मचाऱ्याचा मूळ पगार २.५० लाख रुपये प्रति महिना असेल, तर त्याच्या वार्षिक पगारात १२०००० रुपयांची वाढ होईल.
हेही वाचा – Weight Loss : फक्त झोपून कमी करता येतं आपलं वजन..! जाणून घ्या ‘या’ ५ गोष्टी
AICPI निर्देशांकातून मिळालेल्या माहितीनुसार, १ जानेवारी २०२३ पासून कर्मचाऱ्यांना वाढीव DA चा लाभ मिळणार आहे. यावेळी कर्मचाऱ्यांना ३८ टक्के दराने महागाई भत्ता मिळत होता, मात्र आता त्यात ४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. यापुढे कर्मचाऱ्यांना ४२ टक्के दराने महागाई भत्त्याचा लाभ मिळणार आहे.
कर्मचार्यांच्या डीएमध्ये ४ टक्के वाढ झाल्यास, महागाई भत्ता ४२ टक्क्यांपर्यंत पोहोचेल. जुलै २०२२ मध्येही सरकारने कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये ४ टक्क्यांनी वाढ केली होती. लाखो केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना डीए आणि डीआर वाढीचा फायदा होईल.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!