7th Pay Commission : जर सर्व काही ठीक झाले तर केंद्रीय कर्मचाऱ्यांना एकाच झटक्यात १८ महिन्यांची महागाई भत्त्याची थकबाकी (DA) मिळेल. त्याचप्रमाणे, निवृत्तीवेतनधारक देखील महागाई सवलतीच्या थकबाकीची म्हणजेच डीआर रकमेची वाट पाहत आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सरकार यावर विचारमंथन करत असून लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, वित्त मंत्रालय आणि नॅशनल कौन्सिल ऑफ जॉइंट कन्सल्टेटिव्ह मशिनरी व्यतिरिक्त, कार्मिक आणि प्रशिक्षण विभाग यांच्यात यावर चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या आहेत. मात्र, ही थकबाकी किती दिवसांपासून आहे ते जाणून घेऊया.
काय आहे प्रकरण?
कोरोनाच्या काळात केंद्रीय कर्मचाऱ्यांना सहामाही आधारावर मिळणारा महागाई भत्ता आणि पेन्शनधारकांच्या महागाई सवलतीवर बंदी घालण्यात आली होती. सरकारने कर्मचार्यांना १८ महिने म्हणजे १ जानेवारी २०२० ते ३० जून २०२१ या कालावधीत डीए दिलेला नाही.
हेही वाचा – Vikram Gokhale Death : विक्रम गोखले यांचे हे गाजलेले ५ चित्रपट नक्की पाहाच!
काय आहे नियम?
सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींनुसार, केंद्रीय कर्मचाऱ्यांना सहामाही आधारावर महागाई भत्ता किंवा सवलत वाढवावी लागेल. यामुळेच सरकार वर्षातून दोनदा महागाई भत्ता किंवा सवलत वाढवते. मात्र, कोरोनाच्या काळात साडेतीन वर्षे महागाई भत्ता किंवा दिलासा तसाच राहिला. तीच साडेतीन वर्षांची थकबाकी देण्याची मागणी केली जात आहे.