BRICS summit 2023 : ब्रिक्स परिषदेत दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्रपतींनी मोठी घोषणा केली आहे. सौदी अरेबिया, इराण, इजिप्त, इथिओपिया, अर्जेंटिना आणि यूएई हे सहा देश ब्रिक्समध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. या परिषदेत पतंप्रधान मोदीही उपस्थितीत आहेत. भारताने या निर्णयाचे समर्थन केले असून यामुळे जगाला बळ मिळेल, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
ब्रिक्स मंचावरून पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत, दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरिल रामाफोसा म्हणाले की, आम्ही ब्रिक्स विस्तार प्रक्रियेसाठी मार्गदर्शक तत्त्वे, निकष, कार्यपद्धती यावर एक करार केला आहे. या ब्रिक्स विस्तार प्रक्रियेच्या पहिल्या टप्प्यावर आमचे एकमत आहे. आम्ही अर्जेंटिना, इजिप्त, इथिओपिया, इराण, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती यांना ब्रिक्सचे पूर्ण सदस्य होण्यासाठी आमंत्रित करण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन सदस्य 1 जानेवारी 2024 पासून BRICS चा भाग होतील.
हेही वाचा – Petrol Diesel Price Today : कच्च्या तेलाच्या दरात पुन्हा घट, वाचा तुमच्या शहरातील पेट्रोल डिझेल किंमत
BRICS मध्ये समाविष्ट असलेल्या नवीन देशांची यादी
- सौदी अरेबिया
- ईरान
- मिस्र
- इथियोपिया
- अर्जेंटीना
- यूएई
BRICS च्या सध्याच्या देशांची यादी
- ब्राझील
- रशिया
- भारत
- चीन
- दक्षिण आफ्रिका
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!