खुशखबर..! देशात १ ऑक्टोबरपासून सुरू होतंय 5G; होणार ‘असा’ फायदा!

WhatsApp Group

5G Mobile Service : खूप काळापासून देशात 5G मोबाईल सेवेची प्रतीक्षा होती. आता माध्यमांच्या वृत्तानुसार १ ऑक्टोबरला देशात 5G सेवा सुरू होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी इंडिया मोबाईल काँग्रेसमध्ये ही सेवा सुरू करणार आहेत. दिल्लीतील प्रगती मैदानावर इंडिया मोबाईल काँग्रेसचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचबरोबर 5G सेवेबाबत अमेरिकेतील विमान वाहतुकीच्या मुद्द्यावरील शंकाही दूर झाल्या आहेत. या प्रकरणाच्या अभ्यासानंतर, दूरसंचार मंत्रालयाने एक निवेदन जारी केले आहे की यासंदर्भात देशात कोणतीही अडचण येणार नाही.

या समस्येबाबत आयआयटी मद्रासमध्ये अभ्यास करण्यात आला. आयआयटीच्या अभ्यासानुसार, गॅपिंगमुळे अमेरिकेत जी समस्या उद्भवली ती भारतात होणार नाही. या सेवेचा तुम्हाला काय फायदा होईल हे जाणून घेऊया.
जलद इंटरनेट सेवा, तुम्ही उच्च दर्जाचे व्हिडिओ, फोटो आणि कागदपत्रे काही सेकंदात डाउनलोड करू शकाल.

हेही वाचा – रॉजर फेडररसाठी नदाल रडला..! विराट कोहली म्हणतो, “हा माझ्यासाठी आत्तापर्यंतचा…”

  • 5G सेवेमध्ये, मॉडेम एक चौरस किलोमीटरमध्ये एक लाख कम्युनिकेशन उपकरणांना सपोर्ट करेल.
  • 5G सेवा 4G सेवेपेक्षा दहा पट वेगवान असेल.
  • 5G सेवा 3D होलोग्राम कॉलिंग, मेटाव्हर्स आणि एज्युकेशन ऍप्लिकेशन्समध्ये नवीन क्रांती आणेल.
  • भारतीय ग्राहकांना लवकरच निवडक शहरांमध्ये 5G सेवा मिळणे सुरू होईल आणि पुढील १२-१८ महिन्यांत त्यांचा व्यापक प्रसार दिसेल.

तज्ञांचे म्हणणे आहे की 5G तंत्रज्ञानाचा परिचय करून दिल्याने भारताला खूप फायदा होईल. मोबाइल नेटवर्क ऑपरेटर्सचे प्रतिनिधित्व करणाऱ्या जागतिक उद्योग संस्थेचा अंदाज आहे की २०२३ ते २०४० दरम्यान भारतीय अर्थव्यवस्थेला ३६.४ ट्रिलियन रुपये किंवा ४५५ अब्ज डॉलर्स चा फायदा होईल.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment