

3 Year Old Boy Chews Snake : साप चावल्याने माणसाचा मृत्यू होतो हे तुम्ही ऐकले असेलच. पण, लहान मुलाला चावल्यामुळे सापाचा मृत्यू झाल्याची बातमी तुम्ही कधी ऐकली आहे का? हे धक्कादायक प्रकरण उत्तर प्रदेशातील फारुखाबाद येथील आहे. मुलाने जिवंत साप चावला, त्यामुळे साप मरण पावला. सध्या डॉक्टरांनी मुलावर प्राथमिक उपचार करून त्याला घरी पाठवले आहे.
उत्तर प्रदेशातील फारुखाबादमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. खेळत असताना तीन वर्षांच्या मुलाने सापाला चॉकलेट समजून तोंडात ठेऊन त्याला चावून मारले. नातेवाइकांनी घाईगडबडीत मुलाला रुग्णालयात नेले. तसेच, मृत सापही घेऊन गेले. रुग्णालयातील घटनेची माहिती मिळताच डॉक्टरांनाही धक्का बसला. सध्या बाळाची प्रकृती ठीक आहे.
हेही वाचा – Monsoon : पावसाला उशीर का होतोय? हवामान खात्याने दिले ‘असे’ कारण!
हे प्रकरण मोहम्मदाबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मदनापूर गावातील आहे. येथे राहणाऱ्या दिनेश कुमार यांचा तीन वर्षांचा मुलगा अक्षय हा आदल्या दिवशी घराबाहेर खेळत होता. यादरम्यान घराजवळील झाडीतून एक छोटा साप बाहेर आला आणि मुलासमोर आला. यानंतर, मुलाने खेळकरपणे साप तोंडात ठेवला आणि त्याला चावले. इतक्यात मुलाच्या आजीची नजर त्याच्यावर पडली.
हातात साप पाहून मुलाची आजी ओरडली आणि तिने मुलाच्या हातातून साप काढून फेकून दिला. यानंतर कुटुंबीयांनी त्यांना तातडीने जवळच्या आरोग्य केंद्रात नेले. तेथे डॉक्टरांनी मुलाला राम मनोहर लोहिया रुग्णालयात पाठवले. यासोबतच नातेवाईकांनी मृत सापालाही रुग्णालयात नेले होते.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!