VIDEO : स्टेजवर पार्वती म्हणून नाचणाऱ्या २० वर्षाच्या कलाकाराचा हार्ट अटॅकनं मृत्यू!

WhatsApp Group

Death While Dancing : नाचताना मृत्यूच्या घटनांमध्ये अचानक वाढ झाली आहे. यापूर्वी उत्तर प्रदेशातील बरेली येथे वाढदिवसाच्या पार्टीत एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. काही दिवसांनी मैनपुरीमध्ये हनुमानाच्या भूमिकेत नाचणाऱ्या एका व्यक्तीचा मृत्यू झाला. आता जम्मूमध्ये डान्स करताना एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. तो माणूस पार्वतीच्या भूमिकेत नाचत होता. नाचताना पडला आणि उठला नाही. त्याला डॉक्टरांकडं नेण्यात आलं. हृदयविकाराच्या झटक्यानं त्याचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.

जम्मू जिल्ह्यातील बिश्नेह तालुक्यात गाव कोठे सैनिया जागरण आयोजित करण्यात आले होते. यावेळी कलाकार देवी-देवतांच्या भूमिकेत नाचत होते. दरम्यान, रंगमंचावर शिवपार्वतीच्या लीला रंगल्या होत्या, ज्यामध्ये सतवारी, जम्मू येथील रहिवासी २० वर्षीय कलाकार योगेश गुप्ता आई पार्वतीच्या भूमिकेत शिवस्तुतीवर नृत्य करत होता. नाचताना योगेश खाली पडला. थोडा वेळ कोणालाच समजलं नाही. त्यानंतर दुसऱ्या कलाकारानं योगेशला उचलण्याचा प्रयत्न केला, पण तो उठू शकला नाही. त्याला तातडीनं रुग्णालयात नेण्यात आले, तिथं डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.

हेही वाचा – VIDEO : १५ बायकांसह आनंदानं गावात राहतोय ‘हा’ माणूस; मुलांची संख्या आहे १०७!

बर्थडे पार्टीत एकाचा मृत्यू

यापूर्वी बरेलीमध्ये डान्स करताना एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. भारतीय पशुवैद्यकीय संशोधन संस्थेत (आयव्हीआरआय) नियुक्त प्रयोगशाळा तंत्रज्ञ प्रभात प्रेमी (४५ वर्षे) हा त्याचा मित्र विशाल उर्फ ​​मनीषच्या वाढदिवसाच्या समारंभाला उपस्थित होता. शहरातील एका हॉटेलमध्ये या बर्थडे पार्टीचे आयोजन करण्यात आलं होतं. उत्सवादरम्यान प्रभात डीजेच्या तालावर नाचू लागला.

हेही वाचा – धक्कादायक..! तिरडी खांद्यावर घेऊन पुराच्या पाण्यातून काढली अंत्ययात्रा; पाहा VIDEO

यावेळी पार्टीत उपस्थित लोक त्याच्या डान्सचे व्हिडिओ बनवत त्याचा उत्साह वाढवत होते. दरम्यान, प्रभात अचानक बेशुद्ध होऊन जमिनीवर पडला. यानंतर प्रभातला लगेचच खुशलोक रुग्णालयात पाठवण्यात आले, मात्र तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.

हनुमान बनलेल्या व्यक्तीचाही नाचताना मृत्यू

मैनपुरी येथील गणेश पंडालमध्ये नृत्य करताना कलाकार रवी शर्माचा मृत्यू झाला. घटनेच्या वेळी शेकडो लोक तेथे उपस्थित होते. हनुमानाची वेशभूषा परिधान केलेला कलाकार अचानक स्टेजवर पडला. लोकांना वाटलं की तो अभिनय करतोय. काही वेळ त्याच्या अंगात हालचाल झाली नाही, मग लोकांनी जवळ जाऊन त्याला पाहिले. रवी शर्माला बेशुद्ध अवस्थेत तातडीने मैनपुरी जिल्हा रुग्णालयात नेण्यात आलं. जिथं डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment