Video : मन हेलावणारी घटना..! १९ वर्षीय तरुणाचा लग्नात नाचताना मृत्यू; पाहा तो प्रसंग!

WhatsApp Group

19 Year Old Boy Dies Of A Heart Attack : भारतात कोरोना नंतर, हृदयविकाराच्या झटक्यांमध्ये विशेषतः तरुणांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. आता तेलंगणातून एक बातमी समोर आली आहे. येथे शनिवारी रात्री १९ वर्षीय तरुण त्याच्या नातेवाईकाच्या लग्नाला पोहोचला होता. हा तरूण जल्लोषाच्या मूडमध्ये होता आणि पाहुण्यांच्या उपस्थितीत एका लोकप्रिय गाण्यावर नाचत होता. नाचत असताना अचानक तो बेशुद्ध पडला. कुटुंबीयांनी त्यांना तातडीने रुग्णालयात नेले, तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

एका वृत्तानुसार, मृताचे नाव मुट्यम असे आहे. मुट्यम हा मूळचा महाराष्ट्राचा रहिवासी होता. हैदराबादपासून सुमारे २०० किमी अंतरावर असलेल्या निर्मल जिल्ह्यातील पारडी गावात एका नातेवाईकाच्या लग्नाच्या रिसेप्शनला तो पोहोचला होता. यावेळी तो नाचत होता. या घटनेचा व्हिडिओही इंटरनेटवर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, मुट्यम पांढरा शर्ट घालून नाचत होता, अचानक तो खाली पडला मग एक व्यक्ती त्याच्यापर्यंत पोहोचतो आणि त्याला उचलण्याचा प्रयत्न करतो.

हेही वाचा – How To Treat At Home When Insect Bite : कीटकाने घेतलाय चावा? लवकर करा ‘हे’ घरगुती उपाय

डॉक्टरांनी सांगितले की तरुणाला हृदयविकाराचा तीव्र झटका आला असावा, ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला. तेलंगणात चार दिवसांत अशी ही दुसरी घटना आहे. यापूर्वी, २२ फेब्रुवारी रोजी हैदराबादमध्ये जिम वर्कआउट दरम्यान २४ वर्षीय पोलीस कॉन्स्टेबलचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment