मध्य प्रदेशमध्ये बस पुलावरून नदीत कोसळली..! 15 प्रवाशांचा मृत्यू; 25 जण जखमी

WhatsApp Group

Madhya Pradesh Bus Accident : मध्य प्रदेशातील खरगोन जिल्ह्यात बस पुलावरून नदीत पडून भीषण अपघात झाला आहे. या अपघातात आतापर्यंत 15 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर 25 प्रवासी जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जिल्ह्यातील ऐन पोलीस ठाण्याच्या दसंगाजवळील डोंगरगाव पुलावर हा अपघात झाला. जिथे प्रवाशांनी भरलेली बस सुमारे 20 फूट खाली पडली. दुसरीकडे अपघाताची माहिती मिळताच प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून जखमींना रुग्णवाहिकेतून रुग्णालयात हलवण्यात येत आहे.

प्रभारी मंत्री कमल पटेल यांनी मृतांना दुजोरा दिला. उर्वरित जखमींवर खरगोनमध्येच उपचार सुरू असल्याचे मंत्र्यांनी सांगितले. जखमींवर उत्तम उपचार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनीही या घटनेची माहिती घेतली आहे. चालकाच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात झाल्याचे प्रभारी मंत्री कमल पटेल यांनी मान्य केले.

हेही वाचा – IPL 2023 : ‘फ्लॉप’ जोफ्रा आर्चर आयपीएलमधून बाहेर..! मुंबई इंडियन्सला धक्का; ‘या’ खेळाडूचा समावेश

मीडिया रिपोर्ट्सनुसार, मां शारदा ट्रॅव्हल्सची बस खरगोनहून इंदूरला जात होती. खरगोन-ठीकरी मार्गावर हा अपघात झाला. बस नदीवरील पुलावरून जात होती. त्यानंतर अचानक बस खाली पडली. यानंतर खूप मोठा आवाज झाला, जे ऐकून स्थानिक लोक घटनास्थळी पोहोचले. बस घसरल्यानंतर घटनास्थळी राडा झाला. बसमध्ये 35 हून अधिक प्रवासी असल्याची माहिती मिळत आहे. त्याचवेळी राज्य सरकारचे गृहमंत्री डॉ.नरोत्तम मिश्रा यांनी या दुर्घटनेवर शोक व्यक्त करत 15 जणांचा मृत्यू झाला तर 25 जण जखमी झाल्याची माहिती दिली. या अपघाताच्या दंडाधिकारी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

दुसरीकडे, मध्य प्रदेशातील शिवराज चौहान यांच्या सरकारने बस अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 4 लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा केली आहे. त्याचबरोबर गंभीर जखमींना 50-50 हजार रुपये, सामान्य जखमींना 25-25 हजार रुपयांची भरपाई जाहीर करण्यात आली आहे. याशिवाय अपघातातील जखमींवर शासनाकडून योग्य उपचाराची व्यवस्था करण्यात येणार आहे.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment