Gujarat Morbi Bridge Collapse : गुजरातमधील मोरबी येथे केबल पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा सातत्याने वाढत आहे. त्याचवेळी अपघाताचे फोटो आणि व्हिडिओही समोर आले आहेत. या अपघातात अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत. मोरबी जिल्ह्यातील विविध रुग्णालयात जखमींवर उपचार सुरू आहेत. काहींची प्रकृती गंभीर आहे. त्यापैकी बहुतेकांना सोमवारी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येणार आहे. दुपारपर्यंत बचावकार्यही पूर्ण होईल, असा विश्वास आहे.
राजकोटचे भाजप खासदार मोहनभाई कल्याणजी कुंडारिया यांच्या कुटुंबातील १२ जणांचाही या अपघातात मृत्यू झाला. मोहनभाई कल्याणजी कुंडारिया म्हणाले की, या दुर्घटनेत मी पाच मुलांसह माझ्या कुटुंबातील १२ जणांना गमावले आहे. मी माझ्या बहिणीच्या कुटुंबातील सदस्य गमावले.
#Exclusive : Morbi Bridge Collapse CCTV 🛑 #Gujarat | Search and rescue operations underway in Morbi where 132 people died after a cable bridge collapsed yesterday. #MorbiBridgeCollapse#Morbi #MorbiGujarat pic.twitter.com/pRvxbQ3tQ1
— Kaushik Kanthecha (@Kaushikdd) October 31, 2022
हेही वाचा – Rules Changing From 1st November : १ नोव्हेंबरपासून बदलणार ‘या’ गोष्टी..! तुम्हाला माहितीयेत?
12 members of BJP MP's family dead in Morbi bridge collapse
Read @ANI Story| https://t.co/r90m10u760#MorbiBridgeCollapse #Morbi #BridgeCollapse #BJP #Gujarat pic.twitter.com/2QcVbGeAR1
— ANI Digital (@ani_digital) October 31, 2022
मोरबी का नाम लेते हुए भावुक हुए पीएम मोदी।
मैं एकता नगर में हूं, पर मेरा मन मोरबी के पीड़ितों से जुड़ा है।
शायद ही जीवन में मैंने बहुत कम ऐसी पीड़ा अनुभव की होगी। एक तरफ करूणा से भरा पीड़ित दिल है तो दूसरी ओर कर्त्तव्य पथ। pic.twitter.com/tzkeWLcNP6
— Mohanbhai Kundariya (@MohanbhaiBJP) October 31, 2022
काय आहे संपूर्ण प्रकरण?
गुजरातमधील मोरबी येथे रविवारी संध्याकाळी एक वेदनादायक दुर्घटना घडली. येथे मच्छू नदीत बांधलेला केबल पूल तुटला, त्यामुळे अनेक लोक नदीत पडले. सायंकाळी लोक छठचा आनंद साजरा करत असताना ही घटना घडली. अपघातातील मृतांची संख्या सातत्याने वाढत असून जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, ज्यावेळी पूल तुटला त्या वेळी शेकडो लोक तेथे उपस्थित होते.