कचरा उचलणाऱ्या 11 महिलांनी काढलं लॉटरीचं तिकीट, जिंकले 10 कोटी!

WhatsApp Group

Kerala Lottery : नगरपालिकेच्या प्लास्टिक कचरा उचलणाऱ्या युनिटमध्ये काम करणाऱ्या 11 महिला कामगारांना स्वप्नातही वाटले नसेल की त्यांना 10 कोटींची लॉटरी लागेल. या 11 महिलांनी एकूण 250 रुपये भरून लॉटरीची तिकिटे खरेदी केली होती. बुधवारी जेव्हा त्यांना ही आनंदाची बातमी मिळाली, तेव्हा हिरवा कोट आणि रबरी हातमोजे घातलेल्या त्या महिला पारप्पनगडी महापालिकेच्या गोदामात घराघरातून गोळा केलेला प्लास्टिक कचरा वेगळा करत होत्या.

केरळ लॉटरी विभागाने जाहीर केले की महिलांनी पैसे गोळा केल्यानंतर खरेदी केलेल्या तिकिटांना मान्सून बंपर म्हणून 10 कोटी रुपयांचे बक्षीस दिले जाईल. अडीचशे रुपयांचे लॉटरीचे तिकीट स्वत: खरेदी करण्याची क्षमता या महिलांमध्ये नव्हती. लॉटरी विजेत्यांना भेटण्यासाठी आणि त्यांचे अभिनंदन करण्यासाठी गुरुवारी येथील महानगरपालिकेच्या गोदामाच्या आवारात मोठ्या संख्येने नागरिकांनी गर्दी केली होती.

हेही वाचा – Horoscope Today: ‘या’ राशींच्या लोकांना होऊ शकतं नुकसान! जाणून घ्या आजचे राशीभविष्य

विजेत्यांपैकी एक म्हणाली, “जेव्हा आम्हाला कळले की आम्हाला जॅकपॉट लागला आहे, तेव्हा आमच्या उत्साहाला आणि आनंदाला पारावार उरला नाही. आम्ही सर्वजण जीवनात अडचणींचा सामना करत आहोत आणि हे पैसे काही प्रमाणात आपल्या समस्या सोडवण्यास मदत करतील.

विशेष म्हणजे तिकीट खरेदीसाठी महिलांनी आपापसात पैसे गोळा करण्याची ही दुसरी वेळ आहे. विजेत्यांपैकी एक असलेल्या एका महिलेने सांगितले की, “गेल्या वर्षी अशाच प्रकारे पैसे गोळा करून आम्ही ओणम बंपर खरेदी केले आणि 7,500 रुपये जिंकले. ती रक्कम आम्ही आपापसात समान वाटून घेतली होती. यामुळे आम्हाला यावर्षी मान्सूनची बंपर तिकिटे खरेदी करण्यास प्रोत्साहन मिळाले.”

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment