भीषण अपघात..! बस-तवेरा कारच्या धडकेत महाराष्ट्रातील ११ कामगार ठार

WhatsApp Group

Bus Tavera Car Road Accident In Madhya Pradesh : मध्य प्रदेशातील बैतुल परतवाडा मार्गावर बस आणि तवेरा कार यांच्यात भीषण टक्कर झाली. तवेरामधील ११ जणांचा मृत्यू झाला. ७ जणांचे मृतदेह तातडीने बाहेर काढण्यात आले. तवेरा कापून ४ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. ही घटना दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडली आहे. मृतांची अद्याप ओळख पटलेली नाही.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत सर्व कामगार असल्याचे समजते. झालर पोलीस स्टेशनपासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या गुडगावजवळ ही घटना घडली. हे सर्व ११ कामगार महाराष्ट्रातील होते.

हेही वाचा – Gold-Silver Price Today : आजचा सोन्या-चांदीचा दर किती? जाणून घ्या…

PM मोदींनी व्यक्त केला शोक

बेतुल येथे रात्री उशिरा झालेल्या अपघातात ११ जणांच्या मृत्यूबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. मृतांच्या निकटवर्तीयांना २ लाख रुपयांची एक्स-ग्रॅशिया रक्कम जाहीर करण्यात आली आहे. शोक व्यक्त करताना मोदींनी त्यांच्या ट्विटमध्ये लिहिले, ”मध्य प्रदेशातील बैतुल येथे झालेल्या दुर्घटनेत लोकांच्या मृत्यूने मी दुखावलो आहे. शोकग्रस्त कुटुंबियांच्या सांत्वना. जखमींना लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा देण्यासोबतच, मृतांच्या नातेवाईकांना PMNRF कडून २ लाख रुपयांची एक्स-ग्रेशिया दिली जाईल.” जखमींना ५० हजार रुपयांची मदतही जाहीर करण्यात आली.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment