Currency Note : नोटाबंदीनंतर नोटांबाबत अनेक प्रकारच्या बातम्या समोर येत आहेत. पण जर तुम्ही नोटांच्या माध्यमातून पैसे कमवण्याचा विचार करत असाल तर आता तुम्हाला १००० रुपयांच्या नोटेऐवजी पूर्ण ३ लाख रुपये मिळतील. हे पैसे तुम्ही कसे कमवू शकता ते आम्ही तुम्हाला सांगतो.
१००० पट जास्त किंमत
नाणी आणि नोटांच्या दुर्मिळतेमुळे किंमत खूप वाढली आहे. नाणी आणि चलन जमा करण्याची आवड असलेले लोक त्यांच्या वास्तविक मूल्यापेक्षा जास्त पैसे देण्यास तयार आहेत. ब्रिटनमध्ये, अद्वितीय अनुक्रमांक आणि ऐतिहासिक महत्त्वामुळे अशा चलनाची अभूतपूर्व किंमतीला विक्री केली जात आहे. एका नाण्याचे मूल्य १००० पट जास्त आहे.
हेही वाचा – Home Loans : तुम्हाला माहितीये…बँक देते ५ प्रकारचे होम लोन; जाणून घ्या कसा घ्याल फायदा!
याशिवाय १००० रुपयांच्या नोटेच्या बदल्यात तुम्हाला पूर्ण ३ लाख रुपये मिळतील. याबाबतची माहिती ‘डेलीस्टार’च्या वृत्तात देण्यात आली आहे. नाण्याची अंदाजे किंमत त्याच्या वास्तविक किंमतीपेक्षा खूप जास्त आहे.
या नोटेच्या बदल्यात ३.५ लाख
जर कोणाकडे १० पाऊंड (१००० रुपयांची) AH17 75 क्रमांकाची प्लास्टिकची नोट असेल, तर सध्या तिची किंमत ३.५ लाख रुपयांपेक्षा जास्त आहे. याशिवाय, जर तुमच्याकडे डबल क्वीन हेड असलेले ५० पेन्स (५० रुपये) चे नाणे असेल तर तुम्हाला १००० पट जास्त किंमत मिळू शकते. लंडन ऑलिम्पिक २०१२ च्या एक वर्ष आधी ५० पेन्सचे नाणे लाँच करण्यात आले होते, या नाण्याला अजूनही ऑनलाइन मागणी आहे.