जगातील एकमेव ‘शाकाहारी’ मगरीचा मृत्यू..! वय होतं ७५ वर्षे; पाहा VIDEO

WhatsApp Group

World’s Only Vegetarian Crocodile : जगातील एकमेव शाकाहारी मगरीचा केरळमध्ये मृत्यू झाला. ७५ वर्षांपासून ही मगर कासारगोड जिल्ह्यातील श्री अनंतपद्मनाभस्वामी मंदिराच्या तलावात राहत होती. अनंतपुरा तलावात मुक्काम करून ती मंदिर परिसराचे रक्षण करायची. पुजाऱ्यांनी मगरीची शेवटची यात्रा हिंदू रीतिरिवाजानुसार काढली आणि परिसराजवळ दफन केले. मगरीला प्रेमाने बाबिया म्हणत. मंदिरात दिलेला भात-गुळाचा प्रसाद ती खात असे. बाबिया शनिवारपासून बेपत्ता होती. रविवारी रात्री ११.३०च्या सुमारास त्यांचा मृतदेह तलावात तरंगताना आढळून आला. यानंतर मंदिर प्रशासनाने पशुसंवर्धन विभाग आणि पोलिसांना याची माहिती दिली.

अनेक राजकारणी आणि शेकडो लोक मगरीला शेवटच्या वेळी पाहण्यासाठी आले होते. गर्दी वाढू लागल्यावर मृतदेह तलावातून काढून मोकळ्या जागेत ठेवण्यात आला. बाबियाला पाहण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री शोभा करंदलाजेही पोहोचल्या. श्रद्धांजली वाहताना त्या म्हणाल्या, ”मगरीचे वास्तव्य ७५ वर्षे मंदिरात होते. देव त्याला मोक्ष देवो.” भाजपचे प्रदेशाध्यक्ष के. सुरेंद्रन म्हणाले, ”लाखो भाविकांनी मगरीचे दर्शन घेतले. बाबियाला भावपूर्ण श्रद्धांजली.”

हेही वाचा – महेंद्रसिंह धोनी नव्या भूमिकेत..! सुपर किंग्जने दिली ‘मोठी’ जबाबदारी

ही मगर पूर्णपणे शाकाहारी होती आणि तलावातील मासे किंवा इतर प्राणी खात नसल्याचा तेथील लोकांचा दावा आहे. बाबिया गुहेत राहत होती. ती दिवसातून दोनदा गुहेतून मंदिरात जायची आणि थोडे चालल्यावर आत जायची. मगर फक्त मंदिरात दिलेला प्रसाद खात असे. तिला शिजवलेला भात आणि गूळ खूप आवडायचा. देवाच्या दर्शनाशिवाय बाबियाचे दर्शन घेण्यासाठी अनेक लोक मंदिरात येत असत आणि स्वतःच्या हाताने भात खाऊ घालत असत. मगरीने आजपर्यंत कोणालाही इजा केली नसल्याचा लोकांचा दावा आहे.

रहस्यमय इतिहास

शतकानुशतके पूर्वी या मंदिरात एक महात्मा तपश्चर्या करत होते असे मानले जाते. तेव्हा भगवान श्रीकृष्णाने बालकाचे रूप घेऊन महात्म्यांना त्रास देण्यास सुरुवात केली. त्यामुळे संतप्त होऊन महात्माजींनी कृष्णाला तलावात ढकलले. आपली चूक लक्षात आल्यावर त्याने देवाचा शोध सुरू केला, पण पाण्यात कोणीच सापडले नाही. या घटनेनंतर जवळच एक गुहा दिसली. या गुहेतून देव नाहीसा झाला असे लोक मानतात. काही दिवसांनी इकडून मगर ये-जा करू लागली.

Leave a comment