पोलिसाने नोकरी सोडून केली पांढऱ्या चंदनाची शेती, कमी खर्चात करोडोंचे उत्पन्न!

WhatsApp Group

चंदनाची लागवड हा उत्पन्नाचा चांगला स्रोत होऊ शकतो. उत्तर प्रदेशच्या एका माणसाने ते शक्य करून दाखवले आहे. याआधी पोलीस अधिकारी म्हणून काम करणाऱ्या अविनाश यांनी नोकरी सोडून पांढर्‍या चंदनाची शेती (White Sandalwood Farming In Marathi) सुरू केली. अवघ्या पाच रोपांपासून शेती सुरू करणारे अविनाश आज 10 राज्यांत 50 एकर शेती करतात. चंदनाच्या लागवडीत खर्च कमी आणि नफा जास्त असतो. शेतकऱ्यांना थोडी वाट पाहावी लागते.

उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यातील रहिवासी असलेले अविनाश कुमार यादव यांनी सर्वप्रथम गोरखपूरमध्ये पांढर्‍या चंदनाच्या लागवडीचा पाया घातला. इथून सुरुवात केल्यानंतर आता ते पूर्वांचलच्या आसपासच्या 10 राज्यांमध्ये पांढर्‍या चंदनाची लागवड करत आहेत आणि शेतकऱ्यांना शिकवत आहेत. येत्या 10 वर्षानंतर यातून कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्यांच्या पुढाकारामुळे जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी आता पांढर्‍या चंदनाची लागवड करण्यास सुरुवात केली आहे.

पांढऱ्या चंदनाची लागवड करण्याची कल्पना अविनाश यांना 2012 मध्ये आली. यानंतर प्रयोग म्हणून त्यांनी 5 ते 7 रोपे आपल्या शेतात लावली. झाडांची अतिशय जलद वाढ पाहून चंदनाच्या लागवडीत चांगला नफा कमावता येईल असे त्यांना वाटले. यानंतर 2018-19 मध्ये त्यांनी कर्नाटकातून 50 पांढर्‍या चंदनाची रोपे आणली. एका रोपाची किंमत 200 रुपये होती. त्यांनी आत्तापर्यंत देशातील 80 कृषी विज्ञान केंद्रे आणि 25 कृषी विद्यापीठांना भेटी देऊन शेतीच्या नवीन तंत्रांची माहिती घेतली आहे. पांढर्‍या चंदनाची लागवड हे कमी वेळात जास्त नफा देणारे पीक आहे.

हेही वाचा – जगातील सर्वात श्रीमंत माणूस, 100 करोडचा हिरा ‘पेपरवेट’ म्हणून वापरायचा!

अविनाश यांच्या मते, पांढर्‍या चंदनाच्या झाडांना फारशी काळजी घेण्याची गरज नसते. पहिल्या एक वर्षात विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. ओसाड जमिनीवरही त्याची लागवड करता येते. त्यासाठी कमी पाणी लागते. पांढर्‍या चंदनाच्या झाडाची उंची 15 ते 20 फूट असते. ते तयार होण्यासाठी 15-20 वर्षे लागतात. पांढर्‍या चंदनाच्या वाढीसाठी आधार देणार्‍या वनस्पतीची गरज असते. पांढऱ्या चंदनासाठी आधार देणारी वनस्पती म्हणजे अरहर, जी झाडाच्या वाढीस मदत करते. अरहरच्या पेरामधून चंदनाला नायट्रोजन तर मिळतोच पण त्याच्या देठ आणि मुळांच्या लाकडात सुगंधी तेलाचे प्रमाणही वाढते.

पांढर्‍या चंदनाचा वापर औषधे, साबण, अगरबत्ती, जपमाळ मणी, फर्निचर, लाकडी खेळणी, अत्तर, हवन वस्तू आणि विदेशात खाद्यपदार्थ बनवण्यासाठी केला जातो. अविनाश यांच्या म्हणण्यानुसार, एक एकर जमिनीवर पांढर्‍या चंदनाची 410 रोपे लावता येतात. रोपांमध्ये किमान 10 फूट अंतर असणे आवश्यक आहे. एका एकरात पांढर्‍या चंदनाचे रोप लावण्यासाठी सुमारे एक लाख रुपये खर्च येतो.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment