Latur Viral Video : यावेळी महाराष्ट्रातील सात हजारांहून अधिक ग्रामपंचायतींच्या निवडणुकीच्या प्रचाराचा शेवटचा टप्पा सुरू झाला आहे. अशा परिस्थितीत लातूर जिल्ह्यातील मुरुडमध्ये प्रचारादरम्यान एक वेदनादायक घटना समोर आली आहे. एका पुरुषाची पत्नी सरपंच पदासाठी उमेदवार आहे. त्यांनी पत्नीच्या बाजूने प्रचार सभेला संबोधित केले. यानंतर खुर्चीवर बसताच त्यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि मंचावरच त्यांचा मृत्यू झाला.
पत्नीसाठी भाषण करून ते स्टेजवरच खुर्चीवर बसले. त्यानंतर त्यांच्या छातीत दुखू लागले. ही गोष्ट त्यांनी पत्नीच्या कानात सांगितली आणि थकून ते खुर्चीवरून खाली पडले. यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. रुग्णालयात त्यांना मृत घोषित करण्यात आले. अमर नाडे असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
नक्की काय झालं?
डॉक्टरांनी मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका असल्याचे सांगितले आहे. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात पतीच्या निधनामुळे सरपंचपदाच्या उमेदवार अमृता तुटल्या आहेत. त्या म्हणाल्या, आता जिंकली तर कोणासाठी, हरली तर काय? मात्र मुरुड गावातील लोक अमृता यांना दिलासा आणि प्रोत्साहन देत आहेत. अमर नाडे यांनी पूर्ण २५ मिनिटे भाषण करून मतदारांना पत्नीच्या बाजूने मतदान करण्याचे आवाहन केले. यानंतर समोर बसलेल्या श्रोत्यांचे हात जोडून आभार मानत ते स्टेजवर ठेवलेल्या रिकाम्या खुर्चीवर जाऊन बसले. मात्र खुर्चीवर बसताच त्यांनी छातीत दुखत असल्याची तक्रार केली. त्यांनी शेजारी बसलेल्या पत्नी अमृता हिच्या कानात हा प्रकार सांगितला आणि खुर्चीवर बसलेल्या अवस्थेत खाली पडले.
मुरूड ग्रामपंचायत सदस्य,अष्टविनायक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अमरजी नाडे यांचे काल रात्री १० च्या सुमारास हृदयविकाराच्या झटक्याने अकाली निधन झाले .ग्रामपंचायत इलेक्शनच्या प्रचार सभेदरम्यान हृदयविकाराचा झटका आला . RIP 💐💐#latur #murud#Amarnade #lastspeech@AbhiPawarBJP @BadeVilas pic.twitter.com/KEx36YKFPD
— Ajay Adsul (@AjayAdsul2) December 15, 2022
#Latur : 25 मिनिटं भाषण केलं, ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत चुलत्याच्या विरोध पॅनल उतरवलेल्या व्यक्तीचा भाषणानंतर स्टेजवरच मृत्यू, लातूर जिल्ह्यातल्या मुरुड गावातील दुर्दैवी घटना, हे शब्द बोलून ते बसले आणि मृत्यूने त्यांना कवटाळलं (VC : महेंद्र जोंधळे, प्रतिनिधी, टीव्ही 9 मराठी) pic.twitter.com/TTQUN7chRs
— Siddhesh Sawant (@ssidsawant) December 15, 2022
ते खुर्चीवरून पडताच मंचावर उपस्थित असलेले लोक त्यांना उचलण्यासाठी धावले. त्याला उचलून रुग्णालयात नेण्यात आले. पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या मृत्यूची बातमी काही वेळातच संपूर्ण मुरुड गावात आणि लातूर जिल्ह्यात पसरली. त्यांच्या पश्चात पत्नी अमृता, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. वयाच्या अवघ्या ४३ व्या वर्षी अशाप्रकारे मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.