

Kerala Black Magic Murder : केरळमधील पथनमथिट्टा जिल्ह्यातील एलांदूरमध्ये एक खळबळजनक घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काळ्या जादूसाठी दोन महिलांचे अपहरण करण्यात आले आणि नंतर त्यांचा बळी देण्यात आला. यानंतर त्यांच्या मृतदेहाचे तुकडे करून दफन करण्यात आले. आरोपीने संबंधित तांत्रिक आणि त्याच्या पत्नीच्या मदतीने हा गुन्हा केला होता. याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत तिघांना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आधी महिलांची हत्या केली गेली आणि नंतर त्यांच्या मृतदेहाचे तुकडे करून तिरुवल्लाजवळ पुरले. आर्थिक समृद्धीसाठी महिलांचा बळी दिल्याचे पोलीस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. मोहम्मद शफी, भागवल सिंग आणि लैला अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत ते पती-पत्नी आहेत. पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, भागवल सिंग हे पारंपारिक मसाज थेरपिस्ट आणि उपचार करणारे डॉक्टर आहेत.
हेही वाचा – वर्ल्डकपपूर्वी भारताला तिसरा धक्का…! ‘स्टार’ खेळाडू संघाबाहेर; त्याच्या जागी ‘हा’ खेळणार!
Kerala | Two dismembered bodies have been found buried inside the premises of a house in the Pathanamthitta district
According to Police, the two women were killed allegedly as 'human sacrifices' in black magic rituals & three people persons have been arrested in this case. pic.twitter.com/nfq2HwQzmY
— ANI (@ANI) October 12, 2022
पोलिसांनी सांगितले की, मोहम्मद शफीने सोशल मीडियाच्या माध्यमातून महिलांशी मैत्री केली आणि नंतर त्यांचे अपहरण केले. या महिला २६ सप्टेंबरपासून बेपत्ता झाल्या होत्या. पद्मम (५२) रा. कडवंथरा आणि रोसिली (५०) रा. कालाडी अशी मृतांची नावे आहेत. पाथनमथिट्टा जिल्ह्यात एका घराच्या आवारात पुरलेले दोन छिन्नविछिन्न मृतदेह पोलिसांना सापडले. या घटनेबद्दल शोक व्यक्त करताना मुख्यमंत्री पिनराई विजयन म्हणाले की, केवळ मानसिकदृष्ट्या आजारी लोकच असे गुन्हे करू शकतात. अशी काळी जादू आणि जादूटोणा सुसंस्कृत समाजासाठी धोकादायक आहे.