अजबच..! गेल्या २२ वर्षांपासून ‘या’ माणसानं अंघोळच केलेली नाही; कारण ऐकाल तर…!

WhatsApp Group

Bihar Man Did Not Bathe From Last 22 Years : जर एखाद्या व्यक्तीला दोन-तीन दिवस अंघोळ करता येत नसेल तर त्याला विचित्र वाटू लागतं. एवढंच नाही तर शरीरातून दुर्गंधीही येऊ लागते. मात्र बिहारच्या गोपालगंजमधील एका व्यक्तीच्या विचित्र वागण्यानं सगळेच आश्चर्यचकित झाले आहेत. ६२ वर्षीय धरमदेव राम यांनी गेल्या २२ वर्षांपासून आंघोळ केलेली नाही आणि आजही ते अंघोळ न करण्यावर ठाम आहेत. त्याहून आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्या व्यक्तीच्या अंगातून खूप दुर्गंधी येते पण ते अजून आजारी पडले नाहीत.

अंघोळ न करण्यापाठचं कारण काय?

धरमदेव यांनी स्नान न केल्यामुळं त्यांची नोकरी गेली. ते कोलकात्यात एका फॅक्टरीत काम करायचे. धर्मदेव राम यांनी अंघोळ न करण्यामागं अनोखं व्रत घेतलं आहे, जे खूपच धक्कादायक आहे. महिलांवरील अत्याचार, जमिनीचे वाद आणि प्राणी हत्या संपेपर्यंत आंघोळ करणार नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे. या तीन मागण्या पूर्ण झाल्यानंतरच ते अंगावर पाणी ओतणार आहेत.

हेही वाचा – “मला काही झालं तर नाना पाटेकर…”, तनुश्री दत्तानं पुन्हा उडवून दिली खळबळ; पोस्ट व्हायरल!

ग्रामस्थांचं म्हणणं काय?

धरमदेव गेल्या २२ वर्षांपासून गोपालगंज जिल्ह्यातील मांझा ब्लॉकमधील बैकुंठपूर गावात राहतात. २००३ मध्ये पत्नी माया देवी यांचं निधन झाल्यानंतरही त्यांनी आंघोळ केली नाही. मग दोन मुलगेही गेले, तरीही अंगावर पाण्याचा थेंबही ओतला नाही. धर्मदेव हे तंत्र-मंत्र करतात, त्यामुळं त्यांना मानसिक आजार झाल्याचं ग्रामस्थांचे म्हणणं आहे. त्यामुळं ते अंघोळ न करण्याचा आग्रह धरत आहेत. धरमदेव सांगतात, ”१९८७ मध्ये अचानक मला वाटलं की जमिनीचे वाद, जनावरांची हत्या आणि महिलांवरील अत्याचार वाढू लागले आहेत.”

This Bihar Man did not bathe for the last 22 years for this pledge
धरमदेव राम

 

हेही वाचा – MiG-21 विमानाचा भारतीय इतिहास वाचलाय का? ६२ वर्षात झाले आहेत २०० अपघात!

तेव्हापासून त्यांनी ठरवलं की अत्याचार थांबणार नाही, अंघोळ करणार नाही. या दरम्यान ६ महिने गुरूसोबत घालवून गुरुदक्षिणा घेतली. धरमदेव भगवान रामाला आपला आदर्श मानतात आणि त्यांचे शब्द आपल्या जीवनात वापरतात.

नोकरीही गेली..

धरमदेव २००० मध्ये कोलकाता येथील एका ज्यूट फॅक्टरीत नोकरी करत होते, मात्र महिलांवरील अत्याचार पाहून त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला होता. मात्र कुटुंबीयांच्या दबावाखाली ते पुन्हा कारखान्याच्या नोकरीत रुजू झाले. त्यानंतर त्यांनी आंघोळ न करण्याचा निर्णय घेतला. ही बाब व्यवस्थापनाला समजताच त्यांना नोकरीवरून काढून टाकण्यात आलं.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment