भारतासह जगात अशी अनेक गावे आहेत, ज्यांना भूतांची गावे म्हटली जातात. मात्र, बहुतांश ठिकाणी यावर मान्यताच मिळालेली नाही. पण आज आपण ज्या गावाबद्दल बोलत आहोत ते जगातील सर्वात हाँटेड गाव (The World Most Haunted Village) मानले जाते. या गावाची सर्वात जास्त हाँटेड जागा म्हणून गिनीज बुकमध्ये नोंद झाली आहे. चला आता जाणून घेऊया या गावाची संपूर्ण कहाणी.
हे गाव केंट, इंग्लंडमध्ये आहे. हे गाव तुम्हाला गुगलवर प्लकली (Pluckley) नावाने सापडेल. या गावाबद्दल असे म्हटले जाते की, रात्रीच्या वेळी येथे मृतदेह ओरडतात. या गावात अशी 12 ठिकाणे आहेत जिथे लोकांना चुकूनही जायला आवडत नाही. येथे भेट दिलेल्या लोकांचे म्हणणे आहे की, या गावाच्या हद्दीत तुम्ही पहिले पाऊल टाकताच तुम्हाला वेगळ्या प्रकारची निगेटिव्ह ऊर्जा अनुभवायला मिळते. ही ऊर्जा स्मशानाजवळून जाताना जाणवते तशीच असते.
हेही वाचा – Paytm कंपनीने 1000 हून अधिक लोकांना कामावरून का काढलं?
हे गाव ओसाड आहे असे नाही. येथे सुमारे 1000 लोक राहतात. मात्र त्यानंतरही सूर्यास्तानंतर कोणीही एकटे घराबाहेर पडत नाही. गावामध्ये एक-दोन नव्हे तर एकूण 15 लोकांची भुते असल्याची येथील लोकांची समजूत आहे. अंधार पडताच या गावातील जंगलातून रडण्याचे आवाज येऊ लागतात, असे या गावातील लोक सांगतात. त्यानंतरही दरवर्षी लोक या ठिकाणी भेट देतात आणि जे अधिक धाडसी असतात, ते रात्रीच्या वेळी त्या ठिकाणी जाण्याचे धाडस करतात जिथून भुताचा आवाज येतो.
गावात भुते कुठून आली?
या गावातील स्थानिक लोक मीडियाला सांगतात, की इथल्या प्रत्येक भूताची वेगळी कहाणी असते. हायवे हाँटिंग नावाच्या ठिकाणी भुताप्रमाणे राहतात. या भूताबद्दल असे म्हटले जाते की 18व्या शतकात काही लोकांनी येथील एका माणसाला तलवारीने कापून झाडाला लटकवले होते. तेव्हापासून त्याचा आत्मा येथे आहे. दुसरी कथा एका शिक्षकाची आहे. या शिक्षकाचा मृत्यू कसा झाला हे माहीत नसले तरी त्याचा आत्मा आजही येथील जंगलात आहे, असे सांगितले जाते. याशिवाय भूतांशी संबंधित इतरही वेगवेगळ्या कथा आहेत.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!