Video : वर्षाला १०० कोटी कमावतं ‘हे’ गाव…! बिझनेस फक्त एकच; जाणून घ्या!

WhatsApp Group

Snake Farming : सापाविषयी अनेक गोष्टी भारतात प्रचलित आहेत. मात्र साप पाळत असल्याचे तुम्ही कधी ऐकले नसेल. पण जगात असे काहीजण आहेत, जे साप पाळतात. त्याचबरोबर साप पाळून कोट्यवधी रुपयांचे उत्पन्नही मिळवतात. असे अनेक देश आहेत जिथे लोक साप पाळून लाखो कमावतात. आज आम्ही तुम्हाला अशाच एका व्यवसायाबद्दल सांगणार आहोत.

कोटींचा व्यवसाय

ज्या पद्धतीने कुक्कुटपालन, मत्स्यपालन केले जाते, त्याच पद्धतीने व्यवसायाच्या उद्देशाने सापही पाळले जातात. याला सापाची शेती म्हणतात. त्यांचे विष काढण्यासाठी साप पाळले जातात आणि त्यांचे विष लाखो-करोडो रुपयांना विकले जाते. साप पाळणे अनेक देशांमध्ये बेकायदेशीर असले तरी चीनमध्ये हा कोट्यवधी रुपयांचा व्यवसाय आहे.

सापाच्या विषाची मागणी

चीनमध्ये लोक साप पाळतात आणि त्याच्या विषातून करोडो रुपये कमावतात. सापाच्या विषाला जगभरात मागणी आहे कारण सापाच्या विषाचा वापर विविध औषधे बनवण्यासाठीही केला जातो. मात्र, या व्यवसायात जितकी जोखीम जास्त तितका नफा जास्त. वेगवेगळ्या प्रजातींनुसार, जागतिक स्तरावर एक लिटर विषाची किंमत करोडोंमध्ये असू शकते.

हेही वाचा – तारीख ठरली..! ‘या’ दरम्यान होणार राज्याचं हिवाळी अधिवेशन; नागपूर सज्ज

नफा जास्त

जागतिक विषाच्या बाजारपेठेत सापाच्या विषाची मागणी वाढत असल्याने साप पालन व्यवसाय अतिशय किफायतशीर आहे. याउलट साप पाळण्याच्या व्यवसायात गुंतलेल्यांची संख्या खूपच कमी आहे, त्यामुळे पुरवठ्यातही तुटवडा आहे. साप पालन व्यवसायामध्ये व्यावसायिक कारणांसाठी विविध सापांच्या प्रजातींचे संगोपन केले जाते. जर एखाद्या व्यक्तीला हा व्यवसाय करण्याची जोखीम घेता येत असेल तर तो त्याच्यासाठी खूप फायदेशीर व्यवसाय आहे.

दरवर्षी करोडोंची कमाई

चीनमधील झिसिकियाओ (Zisiqiao) हे छोटेसे गाव सापांच्या पालनासाठी ओळखले जाते. या गावाला दरवर्षी कोट्यवधी रुपयांची कमाई केवळ सापपालनातून होते. केवळ साप पालन व्यवसायातून हे गाव दरवर्षी सुमारे १०० कोटी रुपये कमवते.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment