चर्चा तर होणारच..! लाडाचा ‘कोंबडा’ मेला आणि मालकानं घातलं तेराव्याचं जेवण; वेळ काढून वाचा!

WhatsApp Group

मुंबई : एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूवर तेराव्याचा कार्यक्रम तुम्ही आजवर पाहिला असेल किंवा ऐकला असेल, पण उत्तर प्रदेशच्या प्रतापगडमध्ये तेराव्याच्या कार्यक्रमाचं एक विचित्र प्रकरण समोर आलं आहे. प्रतापगडमध्ये एका व्यक्तीनं आपल्या कोंबड्याच्या मृत्यूनंतर तेराव्याचं जेवण ठेवलं होतं. या कोंबड्याचं नाव लाली होतं. हा सगळा प्रकार पाहून परिसरातील सर्व लोक आश्चर्यचकित झाले. ५०० ​​गावकऱ्यांना मालकानं आमंत्रण दिलं होतं.

कुत्र्याच्या हल्ल्यात लाली जखमी झाला आणि…

हे प्रकरण प्रतापगढ जिल्ह्यातील फतनपूर पोलीस स्टेशन परिसरातील बेहदौल कला गावातील आहे, जिथं डॉ. शालिकराम सरोज त्यांचं क्लिनिक चालवतात. त्यांनी घरी एक बकरा आणि कोंबडा पाळला. संपूर्ण कुटुंब कोंबड्यावर इतकं प्रेम करू लागलं की त्यांनी त्याचं नाव लाली ठेवलं. ८ जुलै रोजी डॉ. शालिकराम यांच्या शेळीच्या बाळावर कुत्र्यानं हल्ला केला होता. हे पाहून लालीची कुत्र्याशी झटापट झाली. शेळीचं मुल वाचलं पण कुत्र्याच्या हल्ल्यात लाली स्वतः गंभीर जखमी झाला आणि त्यानंतर ९ जुलैला संध्याकाळी लालीचा मृत्यू झाला.

तेराव्याचा करेक्ट कार्यक्रम!

कोंबड्याच्या मृत्यूनंतर त्याला घराजवळ पुरण्यात आलं. अगदी सगळं साधी घटना होती, पण डॉ. शालिकराम यांनी प्रथेनुसार कोंबड्याचा तेरावा जाहीर केल्यावर लोकांना धक्काच बसला. यानंतर अंत्यसंस्काराचे विधी होऊ लागले. मुंडण करण्यापासून ते इतर विधी पूर्ण झाले. बुधवारी सकाळपासूनच मिठाईवाल्यांनी तेरवीच्या जेवणाची तयारी सुरू केली. सायंकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत पाचशेहून अधिक लोकांनी तेराव्यापर्यंत पोहोचून जेवण केलं. त्याची चर्चा परिसरात दुसऱ्या दिवशीही सुरूच होती.

जेवणात काय होतं?

या प्रकरणाबाबत शालिकराम सरोज यांची मुलगी अनुजा सरोज हिनं सांगितलं की, लाली कोंबडा माझ्या भावांसारखा होता. त्यांच्या मृत्यूनंतर दोन दिवस घरात अन्न शिजवलं नाही. शोकाकुल वातावरण होतं. रक्षाबंधनालाही आम्ही त्याला राखी बांधायचो. त्यांचा तेराव्याचा कार्यक्रम करत असताना आणखी ५०० लोकांना जेवण देण्यात आलं. जेवणात पुरी, भाजी, डाळी, भात, कोशिंबीर, चटणी असे पदार्थ केले. या कार्यक्रमाला गावातील सर्व लोकांना आमंत्रित करण्यात आले होतं.

सुरुवातीला गावकऱ्यांचा विश्वास बसला नाही, मात्र शालिकराम यांनी ४० हजार खर्च करून तेराव्याचा कार्यक्रम केला तेव्हा मालकाचं कोंबडीवरील प्रेम पाहून लोकांनी त्यांचं कौतुक केलं. त्याचवेळी शालिकराम यांनी सांगितलं की, कोंबडा आमच्या कुटुंबातील सदस्यासारखा आहे. तो घराचं रक्षण करायचा, सर्वांचं त्याच्यावर अतूट प्रेम होतं. त्यांच्या मृत्यूनंतर तेराव्याचा कार्यक्रम आम्ही केवळ आत्मशांतीसाठी केला.

Leave a comment