‘देवगड हापूस’ आंब्याची पहिली पेटी वाशी मार्केटला रवाना..! मिळणार ‘इतका’ भाव?

WhatsApp Group

Devgad Hapus : मुंबईसह राज्यातील नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कोकणातील हापूस आंब्याच्या हंगामातील पहिली पेटी बाजारात दाखल झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, देव दिवाळी व मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी देवगडमधील कातवण गावचे आंबा बागायतदार दिनेश शिंदे आणि प्रशांत शिंदे यांच्या आंबा बागेतून देवगड हापूसची पहिली पेटी वाशी मार्केटला रवाना करण्यात आली आहे.

शिंदे बंधुंच्या गोरक्ष गणपती मंदिर या ठिकाणी असलेल्या घरानजीकच्या बागेतून फळांचा राजा मुंबईला गेला आहे. त्यांच्या या बागेतील हापूसच्या कलमांना ऑगस्टच्या मध्यापासूनच मोहर येण्यास सुरुवात झाली. मात्र नैसर्गिक संकटांमुळे काही झाडांवरचा मोहर गळून पडला. शिंदे बंधुंनी मेहनतीने चार ते पाच झाडांवरचा मोहर टिकवून ठेवला. देव दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर त्यांनी दोन डझनाची पहिली पेटी वाशी मार्केटला पाठवली. या पेटीला १० हजारांच्या आसपास भाव मिळेल, अशी चर्चा होत आहे.

हेही वाचा – ‘या’ योजनेंतर्गत सरकार देत आहे ५१ हजार रुपये, शिक्षणासाठी होईल ‘असा’ फायदा

देवगडमधील दिनेश शिंदे आणि प्रशांत शिंदे हे प्रगतशील बागायतदार म्हणून ओळखले जातात. यावेळी वाढलेल्या थंडीमुळे आंब्याचा हंगाम लवकर सुरुवात होण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे यंदा आंब्याच्या किंमती वर-खाली होतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

Leave a comment