भात शेती सोडून ‘या’ फुलांची लागवड केली, महिन्याची कमाई झाली 9 लाख!

WhatsApp Group

हरयाणा राज्यातील शेतकरी फक्त फक्त गहू, धान आणि मोहरीचीच लागवड करतो, असा बहुतेक लोकांचा समज आहे. पण हे खरं नाही. येथील शेतकरी आता इतर राज्यांतील शेतकऱ्यांप्रमाणे फळबागांमध्ये रस घेऊ लागले आहेत. राज्यात असे हजारो शेतकरी तुम्हाला आढळतील, जे फळबागातून मोठी कमाई करतात. असाच एक शेतकरी आहे, जो पूर्वी पारंपारिक पिके घ्यायचा, पण आता फुलांची लागवड करत आहे. त्यामुळे त्याचे उत्पन्नही वाढले आहे. विशेष म्हणजे आता जवळपासच्या गावातील लोकही या शेतकऱ्याकडून फुलशेतीच्या बारीकसारीक गोष्टी शिकू लागले आहेत.

फरिदाबाद जिल्ह्यातील हा शेतकरी त्यांच्या वडिलोपार्जित जमिनीवर भात आणि गव्हाची शेती करायचा. पण खर्चाच्या तुलनेत फायदा फारसा झाला नाही. त्यामुळे त्याने रजनीगंधा फुलांची (Rajnigandha Cultivation) लागवड करण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे या शेतकऱ्याला राज्य सरकारकडूनही फुलशेतीसाठी प्रोत्साहन मिळत आहे. फुलशेतीसाठी त्याला उद्यान विभागाकडून चांगले अनुदान मिळते.

हेही वाचा – वाइन, व्हिस्की, रम, बिअर…यापैकी सर्वात जास्त धोकादायक दारू कोणती?

1983 पासून या शेतकऱ्याचे कुटुंब रजनीगंधाची लागवड करत आहे. आता सरकारकडून अनुदान मिळाल्याने त्याचा नफा वाढला आहे. गाझीपूरच्या बाजारात रजनीगंधाची फुले विकून तो दररोज 20 ते 30 हजार रुपये कमावतो. अशा प्रकारे त्याचे दरमहा उत्पन्न सुमारे 9 लाख रुपयांवर जाते. त्याच्या मते, भात-गहू शेतीत रोजची कमाई नाही. पैसा हंगामात एकदाच येतो. या शेतकऱ्याच्या गावात असे 250 शेतकरी रजनीगंधाची लागवड करतात. प्रत्येकजण फुले विकून चांगली कमाई करत आहे. या शेतकऱ्यांना फुलशेतीसाठी सरकार 24 हजार रुपये प्रतिकिलो अनुदान देते. रजनीगंधाची वर्षभर बाजारात मागणी असते. त्यापासून औषधे आणि अत्तरे बनवली जातात. त्याचबरोबर भारतातून थायलंडलाही त्याचा पुरवठा केला जातो.

रजनीगंधाच्या लागवडीचे प्रशिक्षण

हरयाणामध्ये, सरकार शेतकऱ्यांना रजनीगंधाच्या लागवडीचे प्रशिक्षणही देते. जर तुम्हाला रजनीगंधाची लागवड करायची असेल तर तुम्ही ते कोणत्याही हवामानात वाढवू शकता. पण त्याच्या शेतात पाण्याचा निचरा करण्याची चांगली व्यवस्था असावी. निचऱ्याची चांगली व्यवस्था नसल्यास पिकांचे नुकसान होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे शेतकऱ्यांनी पाणथळ व बागायती जमिनीत रजनीगंधाची लागवड करू नये.

उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, तामिळनाडू, कर्नाटक, पश्चिम बंगाल, पंजाब, हरयाणा आणि हिमाचल प्रदेशातील शेतकरी हल्ली मोठ्या प्रमाणात रजनीगंधाची लागवड करत आहेत. डोंगराळ भागात जून महिन्यात तर मैदानी भागात सप्टेंबर महिन्यात त्याची लागवड सुरू होते.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment