देवगडमध्ये २२ कोटींची देवमाशाची उलटी जप्त..! सहा जणांना अटक

WhatsApp Group

Whale Vomit Smuggling Devgad : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यामध्ये देवमाशाची उलटी (Whale Vomit) जप्त करण्यात आली आहे. याप्रकरणी देवगडात सहा जणांना अटक करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागानं ही कारवाई केली. अटक करण्यात आलेल्या लोकांकडून २२ कोटींच्या मुद्देमालासह दोन गाड्याही जप्त करण्यात आल्या आहेत. अटक केलेल्यांमध्ये चार पुरुष आणि दोन महिलांचा आहेत. गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी देवगड पवनचक्की गार्डन समोर सापळा रचून आरोपींना पकडलं. ही उलटी १२ किलो ३७० ग्रॅम वजनाची असून आंतरराष्ट्रीय बाजारात तिची किंमत २२ कोटी ३७ लाख रुपये इतकी सांगण्यात येत आहे.

देवमाशाच्या उलटीला इतकी किंमत का?

देवमाशाच्या उलटीला अॅम्बरग्रीस (Ambergris) असंही म्हटलं जातं. त्याला ग्रे एम्बर देखील म्हणतात. तरंगणारं सोनं नावाचा हा दगडाच्या आकाराचा पदार्थ जगातील रहस्यमय नैसर्गिक खजिनांपैकी एक आहे. अॅम्बरग्रीस हा एक घन, मेणासारखा ज्वलनशील पदार्थ आहे. तो हलका राखाडी किंवा काळा रंगासारखा असतो. हा पदार्थ शुक्राणूंच्या आतड्यांमध्ये आढळतो. परफ्यूम, अत्तर उद्योगात याचा वापर केला जातो. हा पदार्थ अतिशय सुगंधी आणि दुर्मिळ असतो. यामध्ये असलेल्या अल्कोहोलचा वापर महागड्या ब्रँडचे परफ्यूम बनवण्यासाठी केला जातो. त्याच्या मदतीनं, परफ्यूमचा वास बराच काळ टिकवून ठेवता येतो. यामुळे, त्याची किंमत खूप जास्त आहे. गेल्या काही वर्षांत येमेन आणि थायलंडमध्येही हा सागरी खजिना मच्छिमारांच्या हाती सापडला आहे.

Whale Vomit
अॅम्बरग्रीस

 

हेही वाचा – “मुन्नाभाईचं काळीज कळायला…”; मनसेनं उद्धव ठाकरेंना म्हटलं ‘मामू’; लगावला टोला!

अटक केलेल्या या सहा लोकांविरोधात ३९, ४२, ४३, ४४, ४८, ५१ या कलमांनुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ च्या तस्करी प्रकरणी सिंधुदुर्गात प्रथमच इतकी मोठी कारवाई करण्यात आली आहे.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment