होय महाराजा! पंतप्रधानांनी घेतली कोकणातील ‘बापर्डे’ ग्रामपंचायतीची दखल; देशपातळीवर झळकणार गाव!

WhatsApp Group

Baparde in Swachh Gram Panchayat List : तळकोकण म्हणजे सिंधुदुर्गातील देवगडवासियांसाठी अतिशय अभिमानाची बातमी समोर आली आहे. देवगड तालुक्यातील ‘बापर्डे’ हे गाव नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणानं चर्चेत असते. मागील काही काळापासून या गावातील विकास कामांनी राज्यभर दखल घेतल्याचं पाहायला मिळालं. आता या गावाचं नाव थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संकल्पनेत पोहोचलं आहे. पंतप्रधानांच्या संकल्पनेतील स्वच्छ ग्रामपंचायत म्हणून देशपातळीवरील आठ ग्रामपंचायतीमध्ये बापर्डे गावानं नाव पटकावलं आहे. २ ऑक्टोबर २०२२ पूर्वी केंद्रीय समितीच्या मुंल्यांकनानुसार, या गामपंचायतींमधून प्रथम, द्वितीय, तृतीय मुल्यांकन पुरस्कृत केंद्रीय समिती जाहीर करणार आहे.

बापर्डे गाव खास का?

महाराष्ट्र शासनाच्या संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानामध्ये बापर्डे ग्रामपंचायतनं जिल्हा, विभागीय, आणि राज्यस्तरावर पहिला नंबर मिळवला. स्मार्ट ग्राम योजनेमध्ये या गावानं ४० लाखाचं पारितोषही पटकावलं. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिली आय.एस.ओ आणि पहिली पेपरलेस ग्रामपंचायत म्हणून या ग्रामपंचायतीनं सर्वांची वाहवा मिळवली. नानाविध प्रकारचे यशस्वी उपक्रम राबवणारं गाव म्हणून बापर्डेचं नाव सर्वदूर पसरलं. सरपंच संजय लाड यांच्याकडून बापर्डे गावाला सर्वत्र ओळख मिळवून देण्याचं काम चोख पद्धतीनं पार पाडलं जात आहे. आता देशपातळीवर गावाचं नाव झळकल्यामुळं समाधान वाटत असल्याची भावना त्यांच्याकडून व्यक्त करण्यात आली आहे.

हेही वाचा – ‘कोण होणार करोडपती’ कार्यक्रमात सुधा मूर्ती कोकणातल्या कोणत्या शाळेसाठी खेळल्या? ती शाळा करते काय?

व्हिडिओमध्ये झळकणार बापर्डे!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील स्वच्छ ग्रामपंचायतींचा आदर्श नमुना जनतेसमोर ठेवण्यासाठी आठ राज्यातील आठ उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामपंचायतींची निवड करून त्यांचं एकत्रित पाच मिनिटांचे चित्रीकरण बनवण्यासाठी एका समितीची नियुक्ती केली आहे. केंद्राच्या निवड समितीनं बापर्डे ग्रामपंचायतीच्या कामाचं सर्वेक्षण करून प्रमुख बाबींचं चित्रीकरण केलं आहे. आठ ग्रामपंचायतींच्या पाच मिनिटांच्या या व्हिडीओमध्ये बापर्डे ग्रामपंचायत झळकणार आहे. सध्या ही ग्रामपंचायत राज्यस्तरीय स्पर्धेत कोकण विभागाचे प्रतिनिधित्व करत आहे.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment