Sindhudurg : ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेचे आरोग्यमान आणि पर्यायाने जीवनमान उंचवावे व त्यायोगे स्वच्छतेतून समृद्धीकडे ही संकल्पना मूर्त स्वरुपात यावी या उद्देशाने सन 2000-2001 पासून ग्रामीण स्वच्छता कार्यक्रमांतर्गत ”संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता ग्राम स्वच्छता अभियान” महाराष्ट्रामध्ये सुरू करण्यात आले. त्यात ”राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा” घेतल्या जातात. सन 2019-2020 मध्ये कोकण विभागात सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या देवगड तालुक्यातील बापर्डे गावाला प्रथम पारितोषिक मिळाले. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे आणि पालघर या जिल्ह्यांतील गावात चुरशीची स्पर्धा होती. सदर अभियानात उत्कृष्ट कामगिरी केल्यामुळे सिंधुदुर्गचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते बापर्डे गावचे सरपंच संजय लाड यांचा सन्मान करण्यात आला.
सन्मान करताना पालकमंत्री चव्हाण यांनी बापर्डे गावच्या ग्रामस्थांचे कौतुक केले, शिवाय पुढील वाटचालीस शुभेच्छाही दिल्या. ”बापर्डे गावचा एक आदर्श गाव व स्वछतेच्या प्रत्येक उपक्रमात गावाने घेतलेला सहभाग इतर गावांसाठी प्रेरणा देणारा आहे”, असे चव्हाण म्हणाले. व्यासपीठावर पुरस्कार प्रदान करताना शिक्षणमंत्री दिपकजी केसरकर, आमदार निरंजन डावखरे, सीईओ प्रजित नायर, विनायक ठाकूर आदी मान्यवर उपस्थित होते.
हेही वाचा – Investment : निवृत्तीनंतर मासिक उत्पन्न मिळवण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांनी काय करावे?
पुरस्कार घेताना बापर्डे गावचे उपसरपंच विवेक वेद्रुक, माजी सरपंच श्रीकांत नाईकधुरे, ग्रामसेवक शिवराज राठोड, सुशील जाधव, अजित राणे, संदीप नाईकधुरे, जीवन नाईकधुरे, दिलीप नाईकधुरे, ग्रामपंचायत सदस्य संतोष नाईकधुरे, रुपेश मोडकर, दिशा वासगे, प्रियांका राणे, रेवती घाडी, वृषाली नाईकधुरे, प्रज्वल गायकवाड तसेच सफाई कर्मचारी उमेश सकपाळ उपस्थित होते.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!