Punjab Death In Fair : पंजाबमधील फिरोजपूर जिल्ह्यातील दुलचिके गावात एक धक्कादायक घटना घडली आहे. गावातील जत्रेत गेलेल्या तीन मुलांच्या गळ्यात आकाश पाळण्याची दोरी अडकली आणि तिघेही मुले पाळण्यातून खाली पडले. यानंतर पाळणा (Death Due to Swing Malfunction in Fair) त्यांच्यावर आदळत राहिला. या भीषण अपघातात एका मुलाचा मृत्यू झाला. तर दोन जण गंभीर जखमी झाले. घटनेनंतर पाळणा चालवणाऱ्या मालकाने घटनास्थळावरून पळ काढला. मृताच्या कुटुंबीयांच्या जबानीच्या आधारे पोलिसांनी संबंधित मालकावर गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
16 वर्षीय अमनदीप सिंग असे मृताचे नाव आहे. अमनदीपचे वडील जोगिंदर सिंग यांनी सांगितले की, त्यांचा मुलगा अमनदीप हा जत्रा पाहण्यासाठी दुलचिके गावात गेला होता. जत्रेत मोठी गर्दी होती. तेथे लावण्यात आलेल्या बोटीच्या पाळण्यात अमनदीपसह तीन मुले बसली होती. त्यानंतर अचानक दोर तुटून तिघांच्याही गळ्यात अडकला आणि तिघेही पाळण्यातून खाली पडले. यानंतरही पाळणा थांबला नाही, त्यामुळे तिघेही गंभीर जखमी झाले. बराच वेळ त्याला कोणी उचलले नाही.
हेही वाचा – ENG Vs AFG : इंग्लंडच्या माणसाकडून इंग्लंडचा गेम, आता लोक त्याला ‘गद्दार’ म्हणतायत!
तेथे उपस्थित असलेल्या गावातील लोकांनी अमनदीपला उचलले आणि फिरोजपूरच्या खासगी रुग्णालयात नेले. तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवले असता त्याला मृत घोषित करण्यात आले. पोलीस स्टेशन सदर प्रभारी रवी चौहान यांनी अमनदीपच्या मृत्यूला दुजोरा दिला आहे. पोलीस या पाळण्याच्या (Punjab Fair Accident News In Marathi) मालकाचा शोध घेण्यात व्यस्त आहेत. जत्रेत पाळणे आणि दुकाने लावणाऱ्या सर्वांच्या नावांची यादी पोलिसांनी ग्रामपंचायतीकडून मिळवली आहे.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!