Village Stories : तुम्ही अनेक अनोख्या गावांबद्दल आणि त्यांच्या परंपरांबद्दल ऐकले असेल. आता भारतात असं एक गाव आहे, ज्या गावातील प्रकार ऐकून तुम्हाला धक्का बसेल. हे असे गाव आहे जिथे महिला 5 दिवस कपडे घालत नाहीत. आता तुमच्या मनात अनेक प्रश्न येतील, की स्त्रिया कपड्यांशिवाय बाहेर फिरतात का? हे गाव कुठे आहे?
हे अनोखे गाव कुठे आहे?
हे गाव हिमाचल प्रदेशात आहे. हिमाचल प्रदेशातील मणिकर्ण खोऱ्यातील पिनी (Pini Village) नावाच्या गावात शतकानुशतके चालत आलेली परंपरा आहे, ज्यामध्ये महिला वर्षातून 5 दिवस कपडे घालत नाहीत. या पाच दिवस पिनी गावात बाहेरचा कोणीही येऊ शकत नाही. ही प्रथा शतकानुशतके सुरू आहे. येथील लोकही त्याचे काटेकोरपणे पालन करतात.
हेही वाचा – दारुपेक्षा जास्त नशा देतं हे लाल मध! फक्त ‘या’ भागातच मिळतं
महिला हे पाच दिवस घरातच असतात. त्या घराबाहेर पडत नाहीत. ही प्रथा ते त्यांच्या घरीच पुढे नेतात. या काळात केवळ महिलाच नाही तर पुरुषही काही नियम पाळतात. जसे की ते दारू पिऊ शकत नाहीत आणि मांसाहारही करू शकत नाहीत. एवढेच नाही तर या पाच दिवसात पती-पत्नी एकमेकांशी बोलतही नाहीत.
ही परंपरा का?
गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार ही परंपरा पाळली नाही तर काही दिवसांनी महिलेचे काही वाईट होते. या प्रथेमध्ये पती-पत्नी एकमेकांना पाहून हसूही शकत नाहीत. पुरुषांनीही ही परंपरा पाळणे बंधनकारक आहे. गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, जर एखाद्या माणसाने ही परंपरा पाळली नाही तर देवता कोपतात आणि नंतर त्या व्यक्तीचे काहीतरी वाईट होते.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!