Squad Bike For Farmers : नाशिकमध्ये कृषीथॉन प्रदर्शन सध्या चर्चेचा विषय ठरले आहे. ४ दिवसाच्या या प्रदर्शनामध्ये शेतकऱ्यांसाठी उपयुक्त आणि वेगवेगळ्या गोष्टी, उपकरणांचे प्रदर्शन केले जात आहे. या कार्य़क्रमात नाशिकच्या इंजिनीयरिंगच्या विद्यार्थ्यांनी हवा निर्माण केलीय. यात विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांसाठी बनवलेली बाईक सर्वांच्या पसंतीस उतरली आहे. नाशिकमधील ठक्कर डोम परिसरात कृषी प्रदर्शन सुरू आहे.
कोणी बनवली बाईक?
नाशिकच्या के के वाघ इंजिनीयरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी ही स्क्वाड बाईक तयार केली आहे. ही स्क्वाड बाईक बनवण्यासाठी त्यांना ६ महिन्याचा कालावधी लागला. यामध्ये तीन महिने संशोधन आणि तीन महिने वर्कशॉप अशा कालावधीत या बाईकची निर्मिती झाली आहे. क्रोमोली स्टीलचे पाइप तसेच अल्युमिनियम आणि बॉडीसाठी पॉलिकार्बोनेट शीट हे साहित्य वापरून ही बाईक तयार करण्यात आली आहे.
हेही वाचा – Optical Illusion : मिनियन्सच्या या फोटोत लपलेली ३ केळी शोधून दाखवा..! नाही सापडली तर बातमी वाचा
बाईकला खर्च किती?
या बाईकसाठी विद्यार्थ्यांना पाच लाखांचा खर्च आला. भविष्यात मोठ्या प्रमाणात याची मागणी झाल्यास अडीच ते तीन लाखांपर्यंत ही बाईक तयार होणार असल्याचे विद्यार्थ्यांनी नमूद केले आहे. विविध कृषी उपकरणे जोडून शेतीची कामे येईल, अशी ही बाईक आहे. नांगरणी, वखरणी, पेरणी, लावणी, निंदणी, खुरपणी, कापणी यांसारखी शेतीची कामे ही बाईक करेल.
सुमारे २ टन ओढण्याची क्षमता या बाईकमध्ये आहे. त्यामुळे शेतमालाची वाहतूकही होण्यास मदत होईल. प्रत्येक लिटरला २५ किमीचे मायलेज ही बाईक देते. पेट्रोल इंधनावर ही बाईक चालवली जाते.