MP Man Called On CM Helpline For Samosa Matter : समोसा हा प्रकार भारतात राष्ट्रीय नाश्ता म्हणून घोषित केला तरी कोणाला त्रास होणार नाही, कारण भारतातील लोक काहीही खात असोत किंवा खात नसो, पण ते समोसे खातात. समोसा हे असं स्ट्रीट फूड आहे की ते तुम्हाला देशाच्या कानाकोपऱ्यात सापडेल. मात्र, आज याच समोशामुळं मध्य प्रदेशात खळबळ उडाली आहे. तर, मध्यप्रदेशच्या छतरपूरमध्ये एका दुकानदारानं ग्राहकाला समोसासोबत प्लेट आणि चमचा दिला नाही. संतप्त झालेल्या ग्राहकानं थेट मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याकडं याबाबत तक्रार केली. खवळलेल्या त्या ग्राहकानं मुख्यमंत्री हेल्पलाइनमध्ये याबाबत तक्रार केली.
सोशल मीडियावर ही घटना व्हायरल झाल्यानंतर लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही यूजर या घटनेचा आनंद घेऊ लागले आहेत तर काहीजण तक्रारकर्त्याच्या बाजूनं उभे असल्याचे दिसले. मात्र, या सगळ्यात तक्रार ऐकून सीएम हेल्पलाइनच्या अधिकाऱ्यांचा एवढा अनोखा प्रश्न कसा सोडवायचा या प्रश्नानं निश्चितच घाम फुटला असेल.
हेही वाचा – VIDEO : स्टेजवर पार्वती म्हणून नाचणाऱ्या २० वर्षाच्या कलाकाराचा हार्ट अटॅकनं मृत्यू!
तक्रारदार कोण आहे?
वंश बहादूर असं तक्रारदाराचं नाव आहे. बहादूर जेव्हा समोसे घेण्यासाठी छतरपूर बसस्थानकावर पोहोचला तेव्हा दुकानदारानं त्याला समोशासोबत प्लेट आणि चमचा दिला नाही, त्यानंतर ग्राहक इतका संतापला की त्यानं सीएम हेल्पलाइनवर तक्रार केली. बहादूर यांनी सीएम हेल्पलाइनमध्ये लिहिलं, ”छतरपूर बसस्थानकावर राकेश समोसा नावाचं दुकान आहे. इथे जो कोणी समोसा विकत घेतो, त्याला सोबत वाटी आणि चमचा दिला जात नाही. कृपया लवकरात लवकर हा प्रश्न सोडवावा.”
ग्राहक वंश बहादूरनं समोसे खरेदी करून पॅक करण्याची ऑर्डर दिली, तिथं पैसे भरल्यानंतर समोसे आणि चमचे, चटणी न मिळाल्यानं ग्राहकानं दुकानातील नोकराकडून चटणी, चमचा आणि डोण्याची मागणी केली. मात्र बहादुरला त्यांनी नकार दिला. अशा गैरव्यवहारामुळं संतप्त ग्राहकानं सीएम हेल्पलाइनकडं तक्रार केली.
हेही वाचा – VIDEO : १५ बायकांसह आनंदानं गावात राहतोय ‘हा’ माणूस; मुलांची संख्या आहे १०७!
सीएम हेल्पलाइननं काय केलं?
ही विचित्र तक्रार आल्यानंतर सुरुवातीला सीएम हेल्पलाइनच्या कर्मचाऱ्यांना काय करावं हे समजं नसेल. त्यामुळेच तो सोडवायला त्यांना १५ दिवस लागले. मात्र, त्यानंतरही त्यांनी यावर काय करायचं ते सांगितले नाही, त्यानंतर त्यांनी तक्रार बंद केली. मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार हा अन्न विभागात कंत्राटी चालक असून तो जिल्हा अन्न अधिकारी व्ही.के.सिंह यांची गाडी चालवतो. या तक्रारीचा फटका म्हणून त्याला नोकरीवरून काढून टाकण्यात आलं आहे.