पालघरच्या बहडोली जांभळाला GI टॅग, शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण!

WhatsApp Group

पालघरच्या बहडोली जांभळाला GI टॅग (भौगोलिक मानांकन) मिळाला आहे. पाच वर्षांपासून शेतकऱ्यांच्या गटाकडून यासाठी प्रयत्न सुरू होते. बहडोली गावात या जांभळाचे पीक (Bahadoli Jamun) घेतले जाते. याला जांभूळगाव असेही म्हणतात. या गावातील जांभूळ हे त्याच्या अनोख्या आयताकृती फळासाठी प्रसिद्ध आहे. आता या फळाला जीआय टॅग मिळाल्यानंतर त्याच्या विक्रीला चालना मिळणार असल्याचे बहडोली येथील जांभूळ उत्पादक शेतकऱ्यांनी सांगितले. टॅग मिळाल्यानंतर त्याचे आंतरराष्ट्रीय मार्केटिंगही सोपे होईल. या भागातील हजारो शेतकऱ्यांच्या उदरनिर्वाहाचे मुख्य साधन जांभूळ आहे.

डहाणूच्या चिकूनंतर जांभूळ हे पालघर जिल्ह्यातील दुसरे फळ आहे, ज्याला जीआय टॅग मिळाला आहे. 2018 मध्ये, बहडोली येथील रहिवासी जगदीश पाटील यांनी जांभूळ उत्पादक शेतकऱ्यांची संघटना स्थापन करण्यासाठी पुढाकार घेतला. त्यानंतर या फळाला जीआय टॅग मिळण्यासाठी कागदपत्रे दाखल करण्यात आली. आता पाच वर्षांनंतर जीआय टॅग मिळाल्याने शेतकरी खूश आहेत.

हेही वाचा – सायबर फ्रॉड झाला, कुणीतरी ऑनलाइन गंडवलं, तर पहिल्यांदा काय कराल?

बहडोलीमध्ये जांभूळ लागवड अनेक दशकांपासून केली जात आहे. येथील हजारो शेतकरी जांभळाच्या लागवडीवर अवलंबून आहेत. जिल्ह्यातील बहुतांश लोक हे आदिवासी शेतकरी आहेत.

बहडोली जांभळाची लांबी अंदाजे 3.10 सेमी आणि रुंदी 2.87 सेमी आहे. त्याचे वजन 18.32 ग्रॅम आहे. बहडोलीमध्ये 55 हेक्टरवर जांभळाची लागवड केली जाते. शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार दोन झाडे शंभर वर्षांहून अधिक जुनी आहेत. तर इतर अनेक झाडांचे वय 50 ते 80 च्या दरम्यान आहे. एप्रिलपासून सुरू होणाऱ्या दोन महिन्यांच्या हंगामात शेतकऱ्यांना सरासरी 250 रुपये प्रति किलो दर मिळतो. जीआय टॅग मिळाल्याने जांभूळ उत्पादक शेतकऱ्यांना नवी आशा मिळाली आहे. पालघरचा चिकू हा गोडपणा आणि उत्कृष्ट उत्पादनासाठी जगभर प्रसिद्ध आहे. त्यामुळे 2016 मध्ये भारत सरकारने चिकूला जीआ टॅग दिला. जिल्ह्यात सुमारे 5 हजार हेक्टर क्षेत्रावर चिकूची लागवड केली जाते.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment