VIDEO : या गावात नावानं नाही, तर शिट्टी वाजवून हाक मारली जाते! वाचा Whistling Village बद्दल..

WhatsApp Group

Indias Whistling Village : भारतात विविध प्रकारच्या परंपरा आणि संस्कृती आहेत. प्रत्येक गोष्टीबद्दल जाणून घेण्यासाठी एक आयुष्य खूप छोटं पडू शकतं. अशीच एक अनोखी संस्कृती मेघालयातील कोंगथोंग या गावात आहे. या गावातील एक अतिशय मनोरंजक गोष्ट म्हणजे येथील लोक गाणं गाऊन एकमेकांना हाका मारतात आणि या गावातील प्रत्येक रहिवाशाचं नाव एक संगीताच्या स्वरुपात ठेवलेलं आहे. इथं आई आपल्या मुलाचं नाव सामान्य पद्धतीनं न ठेवता एक प्रकारचं संगीत देऊन ठरवतात.

गावाचं वैशिष्ट्य

कोंगथोंग हे Whistling Village म्हणून ओळखलं जातं. कोंगथोंगमधील सुंदर पर्वत, धबधबे आणि देवदार वृक्षांनी वेढलेल्या दरीच्या निसर्गसौंदर्याव्यतिरिक्त, या गावाचे अधिक आकर्षण म्हणजे भन्नाट संस्कृती. असं म्हणतात की या गावात मूल जन्माला आलं की आईच्या हृदयातून जो काही सूर निघतो ते त्या मुलाचं नाव बनतं. ही प्रथा खरोखरच हृदयस्पर्शी आहे. गावात चर्चा कमी आणि सूर जास्त ऐकायला मिळतात. इथं माणसांना नावं नसतात, पण हाक मारण्यासाठी संगीतमय शिट्टीचा वापर करतात.

हेही वाचा –  VIDEO : १५ बायकांसह आनंदानं गावात राहतोय ‘हा’ माणूस; मुलांची संख्या आहे १०७!

लोकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कोंगथोंग हे एक लोकप्रिय गाण्याचं गाव म्हणून ओळखलं जातं. कारण इथं “जिंगरवाई इवबेई” ही लोरी आहे, जिचा लोक एकमेकांना हाक मारण्यासाठी वापर करतात. तुम्ही शिलाँगहून सुमारे दोन तासांच्या प्रवासानं या अतिशय सुंदर गावात पोहोचू शकता. या गावात ६०० हून अधिक लोक राहतात. याचा अर्थ असा की येथे एका वेळी ६०० हून अधिक संगीतसूर ऐकू येतात. विशेष म्हणजे या गावातील लोक लाजाळू आहेत आणि बाहेरच्या लोकांशी त्यांचं पटकन जमत नाहीत. या गावात रस्त्यानं चालत असताना तुम्हाला शिट्ट्यांचे अनेक आवाज ऐकू येतील.

हेही वाचा – व्हॉट्सअ‍ॅपवर एक मेसेज आला आणि कोरोनाची लस बनवणाऱ्या कंपनीला १ कोटींचा चुना लागला!

या गावातील गाण्यांचे सूर सहसा निसर्ग आणि पक्ष्यांकडून प्रेरित असतात. या जंगलात भूत-प्रेतांचा वावर असल्याची गावातील लोकांची धारणा आहे. जर त्यांनी एखाद्याचं नाव घेऊन हाक मारली आणि ऐकली तर ते त्या व्यक्तीवर वाईट जादू करतील आणि ती व्यक्ती आजारी पडेल, असा त्यांचा समज आहे. त्यामुळं त्यांच्या बचावाचं साधन म्हणून गाणी किंवा शिट्टी म्हणत हाक मारली जाते.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment