ट्रेनमध्ये बायकोच्या मृतदेहासह नवऱ्याचा ५०० किमीचा प्रवास..! कारण वाचाल तर डोळ्यात पाणी येईल

WhatsApp Group

Husband Traveled With Wife’s Body In The Train : बिहारच्या दाऊदनगर ब्लॉकमधील बिघा येथील नवीन राम याची पत्नी उर्मिला देवीच्या मृत्यूनं समाज, सुव्यवस्था आणि मानवतेवर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. गरिबी कशी असते आणि आपली समाजव्यवस्था कशी वागते याचं उदाहरण म्हणजे ही घटना आहे. लुधियाना येथून नवीन त्याची आजारी पत्नी उर्मिलासोबत मोरध्वज एक्स्प्रेसच्या सर्वसाधारण बोगीतून बिहारच्या औरंगाबाद जिल्ह्यातील दाऊदनगरला निघाले होते. आजारपणामुळे पत्नीचा शनिवारी सकाळी वाटेतच हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला. ट्रेनमधील गर्दीमुळे नवीन आणि त्याच्या पत्नीला जागा न मिळाल्यानं जमिनीवर बसावं लागलं. सुमारे ५०० किमीपर्यंत नवीननं आपल्या पत्नीचं डोकं स्वतःच्या मांडीवर झाकून ठेवलं. ट्रेनच्या बोगीत मृतदेह कोणीही ठेऊ देणार नाही, अशी भीती त्याला होती.

बराच वेळ महिला अशीच पडून असल्याचं पाहून सहप्रवाशांना संशय आला, टीटीई मार्फत तिची चौकशी केली असता नवीननं त्याचा संयम मोडला आणि सांगितलं, की, होय, त्याची पत्नी आता या जगात नाही. GRP नं शनिवारी सकाळी उत्तर प्रदेशातील शाहजहांपूर येथील पुढील स्टेशनवर उर्मिलाचा मृतदेह ट्रेनमधून उतरवला. सुमारे १२ तासांच्या धावपळीनंतर मृतदेहाचं शवविच्छेदन करण्यात आलं आणि इतर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून पती नवीन रविवारी सायंकाळी पाचच्या सुमारास मृतदेह घेऊन घरी पोहोचला.

हेही वाचा – Foxconn Vedanta Plant : महाराष्ट्रातून कोट्यवधींचा प्रकल्पही गेला आणि लाखो नोकऱ्याही गेल्या!

सर्व गावकरी रडू लागले.

शोक व्यक्त करण्यासाठी गावकऱ्यांचा जमाव पोहोचला आणि परिस्थिती पाहून सर्वजण रडू लागले. गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, हे लग्न तीन वर्षांपूर्वीच झालं होतं. लग्नापूर्वी नवीनच्या पत्नीला हृदयविकार होता. नवीन कुमार यांना चार भाऊ आणि एक बहीण आहे. मोठा भाऊ राजेंद्र राम काही दिवसांपासून गावी आहे. रवींद्र राम आणि धर्मेंद्र राम घराबाहेर आहेत. गरिबीमुळे धर्मेंद्र राम यांचं लग्न होऊ शकले नाही. नवीनचे वडील लालदेव राम घरीच राहतात आणि तेही आजारी आहेत. चारशे रुपये सामाजिक सुरक्षा पेन्शनचं आश्वासन दिलं आहे. याशिवाय उदरनिर्वाहाचं दुसरं साधन नाही. अशा गरीब कुटुंबांकडे सरकारने लक्ष द्यावे, असे माजी पंचायत समिती सदस्य कौशल शर्मा यांचे म्हणणं आहे.

नवीनची पत्नी म्हणजेच उर्मिलाच्या माहेरच्या घरात आई, वडील, दोन लहान बहिणी आणि भाऊ आहे. त्यांची अवस्थाही बिकट आहे. वडील अनिल राम गुजरातमध्ये एका खासगी कंपनीत काम करतात. मुलीच्या मृत्यूची माहिती मिळताच ते बिहारला रवाना झाले. रविवारी उर्मिला देवी यांच्यावर औरंगाबादच्या भाव बिघा गावात अंत्यसंस्कार करण्यात आले.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment