गावात चालू केली मसाले बनवणारी कंपनी, आता होतेय रोजची कमाई!

WhatsApp Group

सिंधुदुर्ग – ज्याच्याकडे व्यवसायाची संधी ओळखण्याची, जोखीम पत्करण्याची आणि आपल्याप्रमाणेच अनेकांनाही रोजगार धमक असेल त्यांनाच यशस्वी उद्योजक म्हणता येते. सिंधुदुर्गातील एका छोट्या गावात राहणाऱ्या महिलेने आपल्या आवडीच्या जोरावर सर्वांना अभिमान वाटेल, अशी कामगिरी केली आहे. वैशाली घाडीगावकर (Vaishali Ghadigaonkar) आता मसाले बनवण्याच्या क्षेत्रात एक यशस्वी उद्योजक बनू इ्च्छिणाऱ्या अनेक महिलांसाठी आदर्श निर्माण करत आहेत.

मालवण येथील नांदोस या गावात वैशाली घाडीगावकर राहतात. त्यांच्या कुटुंबात पती, मुलगा, सासू आहेत. वैशाली यांचा मुलगा सध्या बारावीत शिकत आहे. फक्त घरी बसून राहणे त्यांना पटणारे नव्हते. स्वयंपाकाची आवड असलेल्या वैशाली घरीच भाजीसाठी लागणारे वाटण तसेच मसाले तयार करायच्या. अनेकांनी कौतुक केल्यानंतर त्यांनी युवा परिवर्तनच्या मसाले बनवण्याच्या कोर्समध्ये तब्बल 27 प्रकार शिकून घेतले आणि आपल्या व्यवसायाला प्रारंभ केला.

हेही वाचा – बॉलिवूड, हॉलिवूड किंवा अवॉर्ड शोमध्ये ‘रेड कार्पेट’ का असते? त्याचा इतिहास काय?

आता वैशाली शिवम मसाले नावाचा उद्योग चालवतात. कुटुंबाच्या सहकार्याने त्या 6 प्रकारच्या मसाल्यांची विक्री करतात. गावात त्यांनी आपले छोटेसे दुकानही थाटले आहे. आता त्यामुळे वैशाली घाडीगावकर दर महिन्याला 15 ते 20 हजार रुपये कमावतात. गावातील पाच मुलींना आज शिवम मसाल्यामुळे रोजगार मिळाला आहे. ”मी आधी घरच्या घरी मसाले बनवायचे. आता माझ्या आवडीचे रुपांतर उद्योगात झाले आहे. यामुळे मी आता कुटुंबालाही आर्थिकरित्या मदत करु शकते आणि गावातील माझ्यासारख्या गृहिणींना सुध्दा स्वावलंबी बनवले आहे”, असे वैशाली सांगतात. स्वबळावर एक गृहिणी ते यशस्वी उद्योजक हा वैशाली घाडीगावकरांचा प्रवास अनेक महिलांसाठी प्रेरणादायी आहे.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment