भारत बदलतोय..! जगातील सर्वात उंच मतदान केंद्रावर विक्रमी मतदान; कडाक्याच्या थंडीतही बजावला हक्क

WhatsApp Group

World Highest Booth Creates History : हिमाचल प्रदेशातील सर्व ६८ जागांसाठी मतदान संपले आहे. लाहौल-स्पिती जिल्ह्यात सर्व ५२ मतदारांनी जगातील सर्वात उंच मतदान केंद्र ताशिगांग येथे मतदान केले आहे. म्हणजेच येथे ९८.०८ टक्के मतदान झाले आहे. यासोबतच येथे इतिहासही रचला गेला आहे. निवडणूक आयोगाने १५,२५६ फूट उंचीवर सर्वाधिक मतदान केंद्र स्थापन केले होते. ताशीगंग, काजा गावातील लोकांनी या बुथवर मतदान केले आहे.

लष्कराच्या हेलिकॉप्टरने मतदान पथकाला या मतदान केंद्रावर पाठवण्यात आले. आता ईव्हीएमसंदर्भातील मतदान पथकही हेलिकॉप्टरनेच परतणार आहे. ताशीगावात शंभर टक्के मतदान झाल्याबद्दल उपजिल्हा निवडणूक अधिकारी अभिषेक वर्मा यांनी आनंद व्यक्त केला आहे. ते म्हणाले की, येथे कडाक्याची थंडी असूनही मतदार मतदान करण्यासाठी जगातील सर्वात उंच बूथवर पोहोचले.

हेही वाचा – अतिशहाणपणा करायचा नाय..! इरफान पठाणनं पाकिस्तानच्या पंतप्रधानांना सुनावलं; नेमकं काय घडलं?

ताशीगावात मतदानाबाबत ग्रामस्थांमध्ये प्रचंड उत्साह होता. येथे पारंपारिक वेशातील लोक मतदानासाठी मतदान केंद्रावर पोहोचले. ताशिगांग मतदान केंद्र हे जगातील सर्वात उंच मतदान केंद्र मानले गेले आहे. येथे निवडणूक आयोगाने दोन दिवस आधीच निवडणुकीची तयारी पूर्ण केली होती.

या निवडणुकीत सत्ताधारी भाजपची विश्वासार्हता पणाला लागली आहे. पक्षाला आपल्या विकासाच्या अजेंड्याच्या आधारे पुन्हा विजयाची आशा आहे, तर विरोधी काँग्रेस मतदारांना चार दशक जुन्या पक्षाकडे परत जाण्याचे आवाहन करत आहे. या निवडणुकीत मुख्यमंत्री जयराम ठाकूर, माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांचे पुत्र विक्रमादित्य सिंह आणि भाजपचे माजी अध्यक्ष सतपाल सिंह सत्ती यांच्यासह ४१२ उमेदवारांच्या भवितव्याचा निर्णय होणार आहे.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment