काय सांगता..! हार्दिक पंड्यामुळं बिहारचं पोरगं रातोरात बनलं करोडपती!

WhatsApp Group

Hardik Pandya and Saurabh Kumar : बिहारच्या आराह येथे राहणाऱ्या सौरभ कुमारचं नशीब अचानक बदललं आणि तो रातोरात करोडपती झाला. पण यामागचे कारण होतं क्रिकेटर हार्दिक पंड्या. विद्यार्थ्यांना शिकवणी शिकवणारा सौरभ दोन वर्षांपासून ऑनलाइन क्रिकेट गेममध्ये नशीब आजमावत होता. त्याचप्रमाणे त्यानं भारत आणि ऑस्ट्रेलिया सामन्यातही ‘ड्रीम टीम’ बनवली आणि त्याच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. सौरभनं या यशाचं श्रेय आई-वडिलांना दिलं.

विजयाच्या सूचनेनंतर सौरभनं खाते तपासले असता त्याच्या खात्यात ७० लाख रुपये आले होते. आराह जिल्ह्यातील चारपोखरी ब्लॉकमधील ठाकुरी गावातील सौरभ कुमार अनेक दिवसांपासून ऑनलाइन क्रिकेट गेममध्ये टीम तयार करून पैसे गुंतवत होता.

हेही वाचा – IND Vs AUS : मॅच तिकीटांवरून हैदराबादमध्ये राडा..! पोलिसांचा लाठीचार्ज; पाहा VIDEO

हार्दिक पंड्यानं सौरभचं नशीब पालटलं

सौरभनं सांगितलं की, मंगळवारी संध्याकाळी ऑनलाइन गेमिंग दरम्यान, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्या टी-२० मालिकेतील सामन्यात, भारतीय संघाचे खेळाडू फलंदाज सूर्यकुमार यादव, केएल राहुल, अक्षर पटेल, हार्दिक पंड्या, गोलंदाज उमेश यादव आणि ऑस्ट्रेलिया संघाचे खेळाडू कॅमेरून ग्रीन, टिम डेव्हिड, गोलंदाज जोश हेझलवूड आणि नॅथन एलिस यांनी चांगले प्रदर्शन केले. पण हार्दिक पंड्याच्या शानदार फलंदाजीने सौरभचे नशीबच पालटले. सौरभच्या संघाचा कर्णधार हार्दिक पंड्या होता, त्यानं ३० चेंडूत ७१ धावांची शानदार खेळी खेळली. पंड्याच्या खेळीचा फायदा भारतीय संघाला मिळाला नाही, पण सौरभला झाला. सामना संपल्यानंतर त्याला एक कोटी रुपये जिंकण्याचा संदेश आला. एक कोटी रुपये जिंकल्यानंतर सौरभ खूप आनंदी आहे. त्याच्या खात्यात सुमारे ७० लाख रुपये आले. ३० लाख रुपये कर कपात करण्यात आला आहे.

हेही वाचा – धक्कादायक..! माशाचा काटा खाल्ल्यामुळं व्यक्तीचा वेदनादायक मृत्यू

सौरभचा बराच वेळ प्रयत्न..

सौरभने सांगितले की, २०१९ पासून तो ऑनलाइन गेमिंग अॅपवर एक टीम तयार करत आहे. यामध्ये त्याने अनेक वेळा हजारो रुपये जिंकले आणि हरले. सौरभ पदवीचे शिक्षण घेत आहे. अभ्यासासोबतच त्याला क्रिकेटमध्येही खूप रस आहे. सौरभने सांगितलं, की त्यानं जय कंस ब्रह्म बाबा या नावानं आपला युजर आयडी तयार केला आहे.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment