VIDEO : कोकणातील गणेशोत्सवात सुंदर देखावा, चांद्रयानासह ‘विक्रम’ लँडरची चर्चा!

WhatsApp Group

Ganesh Chaturthi 2023 : महाराष्ट्रात गणेश चतुर्थी मोठ्या उत्साहाने साजरी होत असून घरोघरी गणपती बाप्पाचे आगमन झाले आहे. हा सण विशेषत: कोकणात भरपूर उत्साहात साजरा करतात. मुंबईत असलेले चाकरमानी या सणासाठी मोठ्या संख्येने कोकणात उतरतात. जवळपास अर्धी मुंबई रिकामी होते, असे वर्णन करणारा उत्सव म्हणजे गणेश चतुर्थी. पावसाळा सुरू झाला, की गणेश चतुर्थीचे वेध प्रत्येकाला लागते. त्यात गणपतीची मूर्ती कशी असावी, तिची सजावट कशी असावी, मकर, लाइटिंग वापरून आपला देखावा किती भारी होईल, असे प्रश्न आणि त्याची उत्तरे प्रत्येक कोकणी माणूस शोधतोच. प्रत्येक वर्षी विविध देखावे राज्यभर गाजतात. ट्रेंडिंग विषयानुसार देखावे उभारले जातात. अशातच चांद्रयान-3 आणि त्याचे यश हा यंदाचा सर्वात गरम विषय म्हणून समोर आला आहे. अनेकांनी आपल्या गणेश मूर्तीपाठच्या देखाव्याला चांद्रयानाचे स्वरुप दिले आहे. कोकणातील एका माणसाने चांद्रयानासह विक्रम लँडरही आपल्या देखाव्यात उभे केले आहे.

गणपतीच्या देखाव्यात विक्रम लँडर!

सिंधुदुर्गमधील देवगड तालुक्यात बापर्डे नावाचे गाव आहे. या गावातील श्रीकांत नाईकधुरे यांनी आपल्या गणपतीच्या देखाव्याला चांद्रयानाचे स्वरुप दिले आहे. इतकेच नाही, तर त्यांनी चंद्रावर उतरलेले भारताचे अभिमानास्पद विक्रम लँडरही या देखाव्यात दाखवले आहे. यावर्षी सर्वांना सुखासामाधानाचे वर्ष जावो, यासाठी नाईकधुरे यांनी गणरायाला गाऱ्हाणे घालत आशीर्वाद मागितला आहे. पाहा त्याची एक झलक –

हेही वाचा – टोल भरल्यानंतर पावती जपून ठेवा! अनेकांना माहीत नाहीत त्याचे ‘हे’ फायदे

भारत हा जगातील पहिलाच देश, ज्याने…

भारताचे चांद्रयान-3 मिशन यशस्वी ठरले. 23 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 6.04 वाजता, चांद्रयान-3 चे विक्रम लँडर रोव्हरसह चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरले. प्रत्येक भारतीय या ऐतिहासिक क्षणाची आतुरतेने वाट पाहत होता. चांद्रयान-3 च्या लँडिंगबाबत प्रत्येक भारतीयामध्ये उत्सुकता होती. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीरित्या उतरणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला आहे. यासोबतच चंद्रावर आपले रोव्हर उतरवण्याचा पराक्रम करणारा जगातील चौथा देश ठरला आहे. भारतापूर्वी अमेरिका, रशिया आणि चीनने मिशन मून राबवले होते.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment