NEET Exam Success Story : कठोर परिश्रम आणि दृढनिश्चयाने मोठ्या अडचणींवर मात करून आपली स्वप्ने साकार करू शकतात हे पश्चिम बंगालमधील 21 वर्षीय सरफराजने सिद्ध केले आहे. सरफराजने NEET परीक्षेत 720 पैकी 677 गुण मिळवून यशाची पताका फडकवली आहे. अत्यंत गरीब कुटुंबातून आलेल्या सरफराजसाठी हा प्रवास सोपा नव्हता.
सरफराजने आव्हानांना मागे टाकत यशाची पायरी चढवली. अलख पांडे नावाच्या व्यक्तीने इन्स्टाग्रामवर शेअर केल्यानंतरच सरफराजची कहाणी जगासमोर आली. सरफराज हा एका मजुराचा मुलगा आहे. लहानपणापासूनच सरफराजनेही कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी वडिलांसोबत मजुरीचे काम सुरू केले. मोलमजुरी करूनही या तरुणाने डॉक्टर होण्याचे स्वप्न मनात साठवले.
हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी 2023-24 मध्ये NEET परीक्षेची तयारी सुरू केली. दिवसाच्या कडक उन्हात मजूर म्हणून काम केले, बांधकाम साइटवर मजूर म्हणून घरे आणि बांधकाम साइटवर विटा न्यायचे काम केले. रात्री जागून अभ्यास केला. तो अभ्यासात हुशार होता, पण आर्थिक चणचण हे सरफराजसमोर मोठे आव्हान होते. पण या सगळ्यामुळे तो कधीच हरला नाही. अभ्यासासाठी ऑनलाइन क्लासेसची मदत घेतली. त्याला दिवसा कामावर जायचे होते, त्यामुळे तो सकाळी लवकर उठून अभ्यास करत असे. सरफराज सकाळी 6 ते दुपारी 2 पर्यंत काम करायचा आणि नंतर अभ्यास.
🚨 A 21-year-old daily laborer, Sarfaraz from West Bengal, earning just Rs 300 a day, has cracked the NEET 2024 examination with an impressive score of 677 out of 720. ❤️ pic.twitter.com/hCoUhF9N14
— Indian Tech & Infra (@IndianTechGuide) November 21, 2024
हेही वाचा – बॉर्डर-गावसकर ट्रॉफी : केएल राहुलची विकेट ढापली! पर्थमध्ये भारतीय संघाला झटका, पाहा Video
एवढा अभ्यास केल्यामुळे लोक त्याची चेष्टाही करायचे. या सगळ्यामुळे तो आणखी मजबूत बनला. अखेरीस, त्याच्या सर्व मेहनतीचे फळ मिळाले आणि त्याने नील रतन सरकार मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेतला.
अलख पांडेने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये त्याच्या अडचणी आणि त्याने त्यावर मात कशी केली, हे आठवून सरफराज भावूक होतो. NEET च्या तयारीदरम्यान तुटलेल्या फोनच्या मदतीने अभ्यास सुरू ठेवण्याबद्दल बोलत असताना सरफराजचे डोळे भरून येतात. अनेकवेळा उघड्यावर बसून अभ्यास करावा लागला. आयुष्याची स्वप्ने कठोर परिश्रमाने पूर्ण होऊ शकतात, हेच सरफराजचे जीवन आपल्याला शिकवते.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!