‘स्वीट कॉर्न व्हिलेज’ म्हणून फेमस झालंय हे गाव, शेतकऱ्यांचं उत्पन्न कोटींच्या घरात!

WhatsApp Group

देशातील शेतकरी आता भरड धान्याकडे वळू लागला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्नही वाढले आहे. विशेषत: मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यात शेतकरी मोठ्या प्रमाणावर मक्याची लागवड करत आहेत. जिल्ह्यातील बिजकवाडा गावात शेतकऱ्यांनी चमत्कार केला आहे. या गावातील शेतकरी सर्वाधिक मक्याची लागवड करतात. अशा स्थितीत या गावाची ओळख स्वीट कॉर्न (Sweet Corn Village In Marathi) अशी झाली आहे. लोक आता या गावाला स्वीट कॉर्न व्हिलेज म्हणून ओळखू लागले आहेत. या गावात पिकवलेला मका मध्य प्रदेशलाच नाही तर इतर राज्यांनाही पुरवला जातो.

मिळालेल्या माहितीनुसार, बिजकवाडा गावात सुमारे 160 हेक्टर क्षेत्रात 36 शेतकरी मक्याचे पीक घेत आहेत. यातून त्यांचा घरखर्च भागवला जातो. विशेष म्हणजे मध्य प्रदेश व्यतिरिक्त येथील शेतकरी आपला मका उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि छत्तीसगडला पुरवतात. यावर्षी शेतकऱ्यांनी आपल्या मेहनतीमुळे 2400 टन स्वीट कॉर्नचे उत्पादन घेतले असून, त्यातून त्यांना 3 कोटी 60 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत आहे.

हेही वाचा – CIBIL स्कोर खराब असेल तरीही मिळू शकतं कर्ज! कसं? वाचा ही माहिती

आता बिजकवाडा गावातील शेतकऱ्यांचे यश पाहून इतर गावातील शेतकऱ्यांनीही मका लागवड सुरू केली आहे. बिजकवाडा गावाच्या आजूबाजूच्या सुमारे 10 गावांतील शेतकरी आता मक्याची लागवड करत आहेत. त्यामुळे या भागातील मक्याचे क्षेत्र सुमारे 320 हेक्टरपर्यंत वाढले आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांची संख्या 36 वरून 125 वर पोहोचली आहे. मक्याची लागवड करून उत्पन्न वाढल्याचे शेतकरी सांगतात. ते आता आपल्या मुलांना चांगल्या शाळा-कॉलेजांमध्ये शिक्षण देत आहेत. ते मुलांना तांत्रिक शिक्षणासाठी प्रवृत्त करत आहेत.

भारत सरकार शेतकऱ्यांना भरडधान्य पिकवण्यासाठी प्रवृत्त करत आहे. त्यासाठी त्यांनी श्रीअन्न योजना सुरू केली आहे. त्याचबरोबर अनेक राज्यांमध्ये भरड धान्य पिकवण्यासाठी शेतकऱ्यांना अनुदान दिले जात आहे. त्याचप्रमाणे मक्यात भरपूर पोषक तत्वे आढळतात. यामध्ये व्हिटॅमिन बी 9, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म आढळतात. स्वीट कॉर्नचे सेवन केल्याने शरीर मजबूत राहते असे म्हणतात. याशिवाय चेहरा उजळतो. त्यामुळेच मक्याची मागणी हळूहळू बाजारात वाढत आहे.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment