इंग्लंडहून मायदेशी परतल्यानंतर केली शेती, आता ‘हा’ शेतकरी कमावतोय करोडो रुपये!

WhatsApp Group

England Return Farmer Becomes Mllionaire : पंजाबमधील बाटला येथे राहणारे जगमोहन सिंग नागी यांनी वयाची ६३ वर्षे ओलांडली आहेत. वयाच्या या टप्प्यावर ते शेतीत सक्रिय आहेत. शेतीत चांगला नफा मिळत नाही, असे म्हणणाऱ्यांना त्यांनी चुकीचे सिद्ध केले आहे. ते अनेक दिवसांपासून कंत्राटी शेती करत आहेत. या माध्यमातून आज त्यांनी आपली कोट्यवधींची संपत्ती केली आहे.

७ कोटींहून अधिक उलाढाल

जगमोहन सिंग नागी यांच्या म्हणण्यानुसार, मका, मोहरी आणि गहू व्यतिरिक्त ते गाजर, बीटरूट, कोबी, टोमॅटो इत्यादी भाज्यांची लागवड करतात. मी मोठ्या कंपन्यांना उत्पादने पुरवतो. इंग्लंड, न्यूझीलंड, दुबई, हाँगकाँग ही त्यांची उत्पादने मोठ्या प्रमाणावर निर्यात करतात. त्यांच्यासोबत सुमारे ३०० शेतकरी सामील आहेत. यातून ते ३०० एकर कंत्राटी शेती करत आहेत. सध्या त्यांची वार्षिक उलाढाल ७ कोटींहून अधिक आहे.

इंग्लंडमध्ये अभ्यास

जगमोहन सिंग नागी सांगतात की, भारत-पाकिस्तान फाळणीपूर्वी त्यांचे वडील कराचीमध्ये राहत होते. त्यानंतर ते मुंबईत आले, तेथून पुन्हा पंजाबमध्ये आले आणि त्यांनी पिठाच्या गिरणी दुरुस्तीचा व्यवसाय सुरू केला. माझे वडील या क्षेत्रात काम करत असताना मलाही खाद्यपदार्थाच्या व्यवसायात रस निर्माण झाला. प्रारंभिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर, ते फूड सीरियल मिलिंग आणि इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा करण्यासाठी इंग्लंडला गेले. मग परत आले आणि शेतीशी संबंधित व्यवसायात हात आजमावू लागले.

कॉर्न मिलिंगचा म्हणजेच मक्यावर प्रक्रिया करण्याचा व्यवसाय सुरू केला. हिमाचलच्या शेतकऱ्यांकडून मका खरेदी सुरू केला. मात्र, त्याच्या वाहतुकीसाठी मोठा खर्च येतो. हे लक्षात घेऊन त्यांनी स्वत: मक्याचे पीक घेण्यास सुरुवात केली. यादरम्यान पंजाब कृषी विद्यापीठाशीही करार करण्यात आला होता. १९९१ मध्ये मी कंत्राटी शेती सुरू केली. शेतकऱ्यांकडून पिकांची खरेदी सुरू केली. त्यामुळे मला नफाही मिळू लागला, तसेच शेतकऱ्यांनाही चांगले उत्पन्न मिळू लागले.

हेही वाचा – रिचा चढ्ढाच्या ‘त्या’ ट्वीटनंतर अक्षय कुमार संतापला! म्हणाला, “यापेक्षा जास्त सैन्याचा अपमान…”

जगमोहन सिंग नागी यांच्या म्हणण्यानुसार, ते आपला मका मोठ्या स्नॅक्स आणि पिझ्झा कंपन्यांना विकत आहे. आता ते कॅनिंग आणि भाजीपाला व्यवसायातही हात आजमावत आहे. सरसों का साग, दाल मखनी या पारंपरिक पंजाबी खाद्यपदार्थांसोबतच बेबी कॉर्न, स्वीट कॉर्नचा व्यवसायही सुरू केला आहे. सध्या सेंद्रिय गव्हाचे पीठ आणि मक्याचे पीठ यावर त्यांचा अधिक भर आहे. त्याची स्थानिक बाजारपेठेत विक्री करून तो भरघोस नफा कमावत आहे. आगामी काळात मोहरीच्या तेलावर प्रक्रिया, भात आणि चिया बियाणे लागवड सुरू करण्याचाही त्यांचा विचार आहे.

Leave a comment