एक सामान्य मुलगा ते यशस्वी वायरमन, सिंधुदुर्गच्या ज्ञानेश्वर गोसावीचा प्रेरणादायी प्रवास

WhatsApp Group

माणसाच्या अंगी चिकाटी, मेहनत घ्यायची तयारी आणि कामात सातत्य असल्यास तो यशस्वी नक्की होतो. मग शिक्षण, आर्थिक परिस्थिती त्याच्या आड येत नाही. सिंधुदुर्ग मधील राहणाऱ्या ज्ञानेश्वर गोसावी (MSEB Wireman Dnyaneshwar Gosavi) यानेही आर्थिक स्थितीवर मात करत केवळ मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर यशाचे शिखर गाठले आहे. ज्ञानेश्वर गोसावी हा सिंधुदुर्ग मधील कळसुली या छोटाश्या गावात राहतो. ज्ञानेश्वरचे वडिल वायरमनचे काम करायचे. त्यामुळे ज्ञानेश्वरला या कामाविषयी थोडी माहिती होती.

ज्ञानेश्वरच्या वडिलांचे निधन झाले. आणि गोसावी कुटुंबावर दु:खाचा आघात कोसळला. ज्ञानेश्वरच्या वडिलांच्या आकस्मिक निधनामुळे त्याच्या खांद्यावर कुटुंबाची जबाबदारी आली. ज्ञानेश्वर हा नोकरीच्या शोधात होता. तेव्हा
मित्राच्या सांगण्यावरून ज्ञानेश्वरने युवा परिवर्तनचा वायरमनचा कोर्स पूर्ण केला.

हेही वाचा – VIDEO : यशस्वी जयस्वालची ‘सेहवाग’ स्टाईल सेंच्युरी, सचिनसोबत घेतलं जाणार नाव!

कोर्स पूर्ण झाल्यावर तो MSEB मध्ये नोकरीला लागला. ‘’कोर्समध्ये मी वायरिंगचे कोणते टूल्स कोणते वापरायचे, वीजेचे अर्थिंग चेक करणे, एनर्जी मिटर ते दिवा दुरुस्त करणे या गोष्टी शिकल्याचे ज्ञानेश्वर सांगतो. यामुळे माझा आत्मविश्वासही वाढला. माझ्या आयुष्याला एक नवीन दिशा मिळाली”, असेही त्याने सांगितले.

आज ज्ञानेश्वर दर महिन्याला १५ ते २० हजार रुपये कमावत आहेत. आणि कुटुंबाला आर्थिक हातभारही लावत आहे. एक सामान्य मुलगा ते यशस्वी वायरमन असा त्याचा प्रवास अनेक तरुणांना प्रेरणा देणारा आहे. त्याच्या कामातील कौशल्यामुळे ज्ञानेश्वरचा अनेक ठिकाणी सत्कारही झाला आहे. काम पाहून मला महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाने कामात बढतीही दिल्याचे तो सांगतो.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment