Cawsand And Kingsand : उन्हाळ्यात लोकांना समुद्र किनारी जायला आवडते. आपल्या सर्वांना पिकनिकला जाणे, बीचवर फिरणे आवडते. त्यामुळे तेथील अर्थव्यवस्थेलाही चालना मिळते. कारण बाहेरून लोक येतात. खर्च होतो आणि स्थानिक लोकांना रोजगार मिळतो. मात्र ब्रिटनमधील समुद्रकिनारी असलेल्या एका गावातील लोक यामुळे चिंतेत आहेत. कारण इथे बाहेरील श्रीमंत लोक स्थायिक झाले आहेत.
Cawsand आणि Kingsand या गावातील लोक त्रस्त आहेत. उन्हाळ्यात स्वर्गासारख्या दिसणाऱ्या या गावाला भेट देण्यासाठी जगभरातून लोक येतात. श्रीमंत लोक सुट्टीसाठी येथे येतात आणि गावातील लोकांनाच बाहेर जावे लागते, असे गावातील लोकांचे म्हणणे आहे. कॉर्नवॉल लाइव्हच्या वृत्तानुसार, स्थानिक लोक म्हणतात, की त्यांना आता या शहरातून बाहेर फेकण्यात आले आहे. सामान्य लोक येथे घर घेण्याचे धाडस करू शकत नाहीत. कारण श्रीमंत लोकांच्या प्रवेशामुळे ते खूप महाग झाले आहे.
हेही वाचा – Diesel Cars : खरंच 2027 पर्यंत डिझेल गाड्या बंद होणार?
Second stop on my #FirstHomesNotSecondHones tour is Kingsand/Cawsand on the Rame Peninsula in Cornwall. Too many of these houses have been flipped to be second homes, airbnbs and holiday lets. Good to be working with @KateEwert to make the case for more first homes. pic.twitter.com/gRdEW4OH7R
— Luke Pollard MP (@LukePollard) May 28, 2022
वास्तविक येथे येणारे लोक वर्षभर भाड्याने घरे घेतात. हिवाळा असो वा पावसाळा पर्यटकांच्या आगमनामुळे येथे खळबळ उडाली आहे, मात्र उर्वरित महिन्यांत लोकसंख्या खूपच कमी होते; यामुळे संपूर्ण शहर भुताच्या गावासारखे भासत आहे. दुसरीकडे यामुळे स्थानिकांचे जगणे कठीण झाले आहे. महागाई वाढत आहे.
A lovely stroll around the villages of Cawsand and Kingsand 😎🏖💙#kingsand #cawsand pic.twitter.com/1VrYQNUkS3
— Cherry Jones (@_cherry_jones_) July 19, 2022
हिवाळ्यात सर्वात मोठी समस्या
या लोकांसाठी उन्हाळ्यात राहण्यासाठी अनेक पर्याय आहेत. जसे ते खडकांवर झोपतात. किंवा दूर कुठेतरी राहतात, परंतु हिवाळ्यात समस्या जास्त होते. या लोकांना राहायला जागा नसते. यातील अनेक कुटुंबे किमान वेतनावर काम करतात, त्यांच्याकडे फक्त खाण्यापिण्यासाठी पैसे असतात. इतिहासकार जॉन शेफर्ड यांनी सांगितले की, येथे सामान्य घर खरेदी करणे कोणालाही जमत नाही कारण किंमती खूप वाढल्या आहेत.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!