फुलकोबीची शेती : एक एकरात लागवड, 40 दिवसात 5 लाखांचा नफा!

WhatsApp Group

Cauliflower Farming : उत्तर प्रदेशातील हरदोई जिल्ह्यात शेतकरी लवकर फुलकोबीची लागवड करत आहेत. फुलकोबीच्या लवकर लागवडीमुळे आर्थिक स्थिती सुधारत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. एक एकरात लाखोंचा नफा देणारी ही शेती आता बहुतांश शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरली आहे. मे ते नोव्हेंबर या काळात हिरव्या भाज्यांना महागाईचा अधिक फटका बसत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

अशा परिस्थितीत कमी खर्चात कमी दिवसात जास्त नफा देणारा भाजीपाला शेतकऱ्यांसाठी फायदेशीर आहे. या मार्गाचा अवलंब करून हरदोई येथील शेतकरी फुलकोबीच्या लागवडीतून अधिक नफा कमावत आहेत. काकरघाटा येथील एका रहिवाशाने सांगितले, की ते प्रदीर्घ काळापासून विविध प्रकारच्या भाज्यांची लागवड करत आहेत. जवळपास सर्वच सुरुवातीच्या भाज्यांच्या लागवडीत लाखोंचा नफा आहे.

हेही वाचा – जय शाहनंतर ‘या’ नेत्याच्या मुलाला मिळणार BCCI चं सचिवपद!

एका एकरात 120 क्विंटल फुलकोबी

शेतकऱ्यांनी सांगितले, की सध्या ते फुलकोबीची लागवड करत आहेत. योग्य काळजी घेतल्यास एका एकरात 40 दिवसांत सुमारे 120 क्विंटल फुलकोबी येते. या शेतीत पावसाळ्याच्या दिवसातही फारसे पाणी लागत नाही. योग्य खते, पाणी आणि तण कीड नियंत्रणामुळे पिकाला योग्य भाव मिळतो. त्यांनी सांगितले की त्यांच्या फुलकोबीचे एक रोप एक किलोपेक्षा जास्त वाढत आहे. त्यामुळे त्यांना बंपर नफा मिळत आहे.

एका एकरात 3 ते 5 लाखांचा नफा

सध्या फुलकोबीचा बाजारभाव 100 रुपये किलोवरून 120 रुपये किलोपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना एक एकरात तीन ते पाच लाख रुपयांचा नफा मिळत आहे. हरदोईचे जिल्हा कृषी उपसंचालक नंदकिशोर म्हणाले की, फुलकोबीचे बेड अतिशय नाजूक असतात. शेतीची तयारी करताना चार वेळा शेताची व्यवस्थित नांगरणी केल्यावर माती भुसभुशीत केली जाते.

वालुकामय चिकणमाती जमिनीत फुलकोबी चांगली वाढते. शेणखत हे शेतात जास्त योग्य मानले जाते. फुलकोबीच्या सुरुवातीच्या जातींमध्ये पुसा काटिकी, इम्प्रूव्ह जपानीज, अर्ली कुमारी अशा अनेक बियांचा समावेश होतो. या प्रक्रिया केलेल्या बिया उत्कृष्ट उत्पादन देतात. जिल्हा दंडाधिकारी मंगला प्रसाद सिंह यांनी सांगितले की, कृषी विज्ञान केंद्रामार्फत भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना वेळोवेळी आवश्यक माहिती दिली जाते. चांगले पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदानाची मदतही दिली जाते. अधिक माहितीसाठी शेतकरी कृषी प्रसार भवन, हरदोई येथे जाऊन अधिक माहिती मिळवू शकतात.

व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment