हातात पैसा आला की लोक चैनीच्या गोष्टींकडे आणि मोठमाठ्या शहरांकडे धावू लागतात. आपली लाइफस्टाइल एक पाऊल वर टाकण्याची प्रत्येक माणसाची इच्छा असते, यात काही चुकीचे नाही. बॅँक अकाऊंटमध्ये खूप पैसा आहे, पण गावात राहायला आवडेल का? याच्या उत्तरात अनेकांचा नकार असेल. पण अशीही काही श्रीमंत माणसं आहेत, जी चकमकत्या दुनियेपासून शांत ठिकाणी राहणे पसंत करतात. भारतात असे 5 अब्जाधीश उद्योगपती आहेत, जे गावात राहूनही आपला उद्योग वाढवत आहेत. (Billionaires Who Chose To Live In Villages)
लुलू मॉलचे मालक एमए युसूफ अली (MA Yusuff Ali) यांना गावात राहून आपले साम्राज्य चालवायला आवडते. अली हे लुलू मॉलचे मालक आहेत. आजही त्यांना त्यांचा बहुतांश वेळ केरळमधील त्रिशूर या गावात घालवायला आवडतो. त्यांच्या 3 मुली व्यवसाय सांभाळत आहेत. त्यांची देशात आणि आखाती प्रदेशात 272 रिटेल स्टोअर्स आहेत.
केपी रामासामी हे तामिळनाडूच्या इरोड जिल्ह्यातील आहेत. त्यांची एकूण संपत्ती 19133.7 कोटी रुपये आहे. ते आजही कोईम्बतूरमधील त्यांच्या गावात राहतात. महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांच्या कंपनीत जवळपास 90 टक्के कर्मचारी महिला आहेत.
हेही वाचा – भारताची हवा टाईट केली, वानखेडेवर लोकांना गप्प केलं, कोण आहे डॅरिल मिचेल?
भारतातील 55व्या क्रमांकावरील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणजे श्रीधर वेंबू (Sridhar Vembu). तब्बल 18000 कोटी रुपयांचे मालक असलेले वेंबू चेन्नईजवळील त्याच्या छोट्या गावात राहतात. त्यांच्या झोहो कंपनीचे 6 कोटींहून अधिक यूजर्स आहेत. आजही ते गावात सायकल चालवतात आणि वेळ मिळेल तेव्हा मुलांना शिकवतात.
जॉय अलूकस (Joy Alukkas) हे भारतातील 50 व्या क्रमांकावरील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत आणि त्यांची संपत्ती सुमारे 366 अब्ज रुपये आहे. ते आजही केरळमधील कोची येथे त्यांच्या वडिलोपार्जित घरात राहतात. Joyalukkas ही त्यांची ज्वेलरी रिटेल चेन आहे. त्याचे संपूर्ण कुटुंब दुबईत आहे.
पतंजली आयुर्वेदचे अध्यक्ष आचार्य बाळकृष्ण हे देखील एका छोट्या शहरात राहतात. त्यांची एकूण संपत्ती सुमारे 30000 कोटी रुपये आहे. ते योगगुरू बाबा रामदेव यांचे सहकारी आहेत. पगाराच्या नावावर तो एक रुपयेही घेत नसल्याचा दावा केला जातो.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!